शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

भंडारेश्वर मंदिराच्या चबुतऱ्याला पडल्या भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 01:23 IST

विदर्भातील सप्तधामापैकी एक धाम हे भंडारेश्वर मंदिर आहे. सदर मंदिर आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे आहे. गावाच्या उत्तरेला खोब्रागडी, वैलोचना, नाडवाही या तीन नदींचा संगम असून या संगमाच्या काठावर एका उंच टेकडीवर भंडारेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : गाभाऱ्यात पाणी गळती असूनही छताची दुरूस्ती नाही; मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : विदर्भातील सप्तधामापैकी एक धाम हे भंडारेश्वर मंदिर आहे. सदर मंदिर आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे आहे. गावाच्या उत्तरेला खोब्रागडी, वैलोचना, नाडवाही या तीन नदींचा संगम असून या संगमाच्या काठावर एका उंच टेकडीवर भंडारेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाळ्यात पाणी गळती लागत असून मंदिराच्या चबुतऱ्याला भेगा पडल्या आहेत. मात्र या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडा येथे जे हेमांडपंथी मंदिर आहे, तशाच प्रकारचे भंडारेश्वर हे हेमांडपंथी मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. येथे बारमाही भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. मात्र आता मंदिराच्या अस्तित्वाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंदिराच्या गाभाऱ्या पाणी गळती होत असून याबाबत स्थानिक भंडारेश्वर मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी सूचना केली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाचे मुख्य अभियंता गौंडा हे फेब्रुवारी महिन्यात वैरागड येथे आले होते. त्यांनी भंडारेश्वर मंदिराची पाहणी करून पाणीगळती बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते.पुरातत्त्व विभागाकडून भंडारेश्वर मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले. दरम्यान मंदिर टेकडीच्या खालील भागाचे खोदकाम करण्यात आले. मात्र पाणीगळती संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. पेंडाल उभारण्यासाठी तसेच इतर कामासाठी टेकडीचे खोदकाम करण्यात आले. यात्रेदरम्यान परिसराची स्वच्छता करण्याच्या नावाखाली टेकडीवर वाढलेली झाडे तोडण्यात आली. यामुळे मंदिराला इजा होऊन मंदिराच्या चबुतऱ्याला आणखी भेगा पडण्याची शक्यता आहे.पुरातत्त्व विभागाच्या सूचनेकडे कानाडोळावैरागड येथील भंडारेश्वर मंदिराच्या टेकडीवर उगवलेली झाडे व खुरटी रोप होती. यामुळे मंदिर टेकडीचा परिसर मजबूत राहत होता. टेकडीला आधारही मिळत होता. मात्र आता गेल्या अनेक वर्षांपासून टेकडीवरील झाडेझुडूपे तोडली जात असल्याने मंदिर टेकडीची झिज झाली आहे. यासंदर्भात पुरातत्त्व विभागाने मंदिर समितीला सूचनाही केल्या होत्या. मात्र या सूचनांकडे कानाडोळा केल्याने टेकडीला धोका निर्माण झाला आहे. मंदिर टेकडीच्या परिसरात कोणत्याही कामासाठी खोदकाम करण्यात येऊ नये, तसेच त्यावर उगवलेली झाडेझुडूपे तोडण्यात येऊ नये, अशी सूचना भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात आली आहे व तसा फलकही येथे लावण्यात आला आहे. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने टेकडीला धोका होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Templeमंदिर