साडेदहा लाख नागरिकांना होणार डीईसी गोळ्यांचे वाटप

By Admin | Updated: December 13, 2014 01:53 IST2014-12-13T01:53:00+5:302014-12-13T01:53:00+5:30

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझोलच्या गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम ...

DAC bullets allocated to 150,000 people | साडेदहा लाख नागरिकांना होणार डीईसी गोळ्यांचे वाटप

साडेदहा लाख नागरिकांना होणार डीईसी गोळ्यांचे वाटप

गडचिरोली : राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी व अल्बेंडाझोलच्या गोळ्यांची सामुदायिक औषधोपचार मोहीम ग्रामीण भागात १४ ते १६ डिसेंबर व शहरी भागात १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात साडेदहा लाख लोकांना आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन डीईसी गोळ्यांचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोगाचा २०१५ पर्यंत समुळ नायनाट करणे, समाजात नवीन हत्तीरोग रूग्ण तयार होऊ न देणे, हत्तीरोग बाधीत अवयवांची स्वच्छता व काळजी घेण, हत्तीरोगाविषयी लोकांना आरोग्य शिक्षण देणे हे सामुदायिक औषधोपचार मोहिमेचे उद्दिष्ट आहे. हत्तीरोग दुरीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील दोन वर्षांवरील सर्व नागरिकांना डीईसी गोळ्या वाटप करण्यात येणार आहे. सदर जबाबदारी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनिस, पर्यवेक्षण कर्मचारी आदींवर सोपविण्यात आली आहे. गोळ्या वाटपापासून गरोदर महिला व दुर्धर आजाराच्या रूग्णांना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी आवर्जुन डीईसी गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी आर. बी. ढोले उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: DAC bullets allocated to 150,000 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.