गिधाडांच्या संरक्षणार्थ सायकल दौड

By Admin | Updated: October 11, 2015 02:36 IST2015-10-11T02:36:04+5:302015-10-11T02:36:04+5:30

अमर्याद रासायनिक पदार्थ व औषधांचा शेतात व जनावरांच्या चिकित्सेत वापर, भ्रमणध्वनी टॉवरमधून बाहेर....

Cycle race for vultures protection | गिधाडांच्या संरक्षणार्थ सायकल दौड

गिधाडांच्या संरक्षणार्थ सायकल दौड

क्रीडा, वन विभागाचा पुढाकार : स्कूल आॅफ स्कॉलर्सचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक सहभागी
गडचिरोली : अमर्याद रासायनिक पदार्थ व औषधांचा शेतात व जनावरांच्या चिकित्सेत वापर, भ्रमणध्वनी टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या घातक लहरी यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून गिधाडांचा ऱ्हास होत आहे. शुद्ध वातावरण व पर्यावरणाच्या संतुलनात गिधाडांची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्या बचावासाठी येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या वतीने शहरात शनिवारी सायकल रॅली काढून गिधाडांच्या बचावाचा संदेश देण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वन विभाग यांच्या सहकार्याने स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या वतीने सायकल रॅलीचा प्रारंभ नेत्रतज्ज्ञ डॉ. हेमंत अप्पलवार, वनाधिकारी पेंदोरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्कूल आॅफ स्कॉलर्समधून करण्यात आला. यावेळी स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या प्राचार्य उषा रामलिंगम उपस्थित होत्या. सायकल रॅली इंदिरा गांधी चौक, चामोर्शी मार्ग, आयटीआय चौक, स्मृती उद्यान, कॉम्प्लेक्स परिसरातून गिधाडाच्या बचावाचा संदेश रॅलीत सहभागी २०० सायकलस्वार विद्यार्थ्यांनी दिला. या रॅलीत १२ शिक्षकांचाही सहभाग होता.
रॅलीत सुरळीत पार पडावी, याकरिता सहा ठिकाणी स्टॉल लावून चॉकलेट व ग्लुकोज पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रॅलीत सहभागी शेकडो विद्यार्थ्यांनी सायकलच्या समोर विविध प्रकारचे संदेश देणारे फलक लावून नागरिकांमध्ये पर्यावरणाचे संतुलन राखून गिधाड वाचविण्यासंदर्भात जनजागृती केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Cycle race for vultures protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.