विद्यार्थिनींना सायकल वाटप
By Admin | Updated: August 21, 2015 02:00 IST2015-08-21T02:00:21+5:302015-08-21T02:00:21+5:30
मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना महात्मा गांधी विद्यालय नवेगाव व जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगीसाखरा येथे सायकल वाटप करण्यात आले.

विद्यार्थिनींना सायकल वाटप
गडचिरोली/ आरमोरी : मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना महात्मा गांधी विद्यालय नवेगाव व जवाहरलाल नेहरू विद्यालय जोगीसाखरा येथे सायकल वाटप करण्यात आले.
नवेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात बाहेरगावाहून शिक्षणाकरिता ये- जा करणाऱ्या ९ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी माजी सरपंच नंदकिशोर मांदाळे, के. एस. दोनाडकर, प्रभाकर दोनाडकर उपस्थित होते.
आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच नरेंद्र टेंभुर्णे, मुख्याध्यापक कृष्णा खरकाटे, नामदेव कुमरे, रामचंद्र भालाम, नारायण इंदूरकर, ग्रा. पं. सदस्य मोरेश्वर नारनवरे, युवराज सपाटे, पोलीस पाटील राधा सडमाके, भाष्कर राऊत, अजय सोनवाने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हिरा मोटवानी यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातून विद्यार्थिनी शिक्षण घेण्याकरिता चालत येतात. बहुतांश विद्यार्थिनींची आर्थिक स्थिती कमकूवत असल्याने सायकल खरेदी करू शकत नाही. कार्यक्रमाचे संचालन पोहणकर तर आभार हटवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)