काँग्रेसचा सायकल मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

By Admin | Updated: November 18, 2015 01:25 IST2015-11-18T01:25:27+5:302015-11-18T01:25:27+5:30

रविवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या भावात ३६ पैसे प्रती लिटर तर डिझेलच्या भावात ८७ पैसे प्रती लिटर दर वाढ शासनाने केली आहे.

The cycle cycle of the Congress hit the District Cemetery | काँग्रेसचा सायकल मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

काँग्रेसचा सायकल मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला

निवेदन सादर : पेट्रोल, डिझेल दरवाढीचा केला निषेध
गडचिरोली : रविवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या भावात ३६ पैसे प्रती लिटर तर डिझेलच्या भावात ८७ पैसे प्रती लिटर दर वाढ शासनाने केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या या दरवाढीच्या निषेधार्थ गडचिरोली-चिमूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. दरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला.
युवक काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे यांच्या नेतृत्वात सकाळी ११.३० वाजता येथील इंदिरा गांधी चौकातून कॉम्प्लेक्स मार्गे सायकल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सायकल रॅलीदरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप-सेना युती सरकार विरोधात नारेबाजी केली. संतप्त पदाधिकाऱ्यांनी भाजप सत्ताधाऱ्यांचा यावेळी खरपूस समाचार घेतला.
या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते नंदू वाईलकर, पांडुरंग घोटेकर, अमोल भडांगे, दीपक ठाकरे, तौखिक शेख, प्रभाकर वासेकर, हार्दिक सुचक, मिलिंद खोब्रागडे, राकेश गणवीर, प्रफुल आचले, नचिकेत जंबेवार, प्रदीप मुंजमकर, अजय कुमरे, केवळराव नंदेश्वर, प्रफुल वाकुडकर, जितेंद्र सोमनकर, रवींद्र भरडकर, शुभम पेमपलवार, महेश कोटरंगे, सचिन बदन, कैलाश ठाकरे, राहूल ठाकरे, गौरव अलाम, मिलिंद किरंगे, नरेंद्र भैसारे, कुलदीप इंदुरकर, अकबर शेख, इरफान पठाण, अवधेश नरोटे, रवी उसेंडी, विनोद पोरेटी, जीवन कुत्तरमारे, बाळू मडावी, मिलिंद खोब्रागडे, शेखर कोत्तावार आदीसह काँग्रेस व युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

दरवाढ मागे घ्या
युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात पेट्रोल व डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दुचाकी चालविणे कठीण होते, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: The cycle cycle of the Congress hit the District Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.