गळा कापून इसमाची निर्घृण हत्या

By Admin | Updated: October 4, 2014 23:27 IST2014-10-04T23:27:52+5:302014-10-04T23:27:52+5:30

अज्ञात आरोपींनी एका इसमाची धारदार तीक्ष्ण हत्याराने गळा कापून निर्घृण हत्या केल्याची घटना २ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आसरल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेकडामोटला या गावी घडली.

Cutting the throats and killing him | गळा कापून इसमाची निर्घृण हत्या

गळा कापून इसमाची निर्घृण हत्या

टेकडामोटलाची घटना : मृतकाची रक्कमही पळविली
आसरअल्ली : अज्ञात आरोपींनी एका इसमाची धारदार तीक्ष्ण हत्याराने गळा कापून निर्घृण हत्या केल्याची घटना २ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आसरल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेकडामोटला या गावी घडली. रमेश पर्वताल्लू सोदारी (२३) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.
या संदर्भात मृतकाच्या कुटुंबीयांनी आसरअल्ली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रमेश ार्वतालू सोदारी याची अज्ञात इसमाने तीक्ष्ण हत्याराने गळा कापून हत्या केली व त्याचा मृतदेह गावाबाहेरील झाडाखाली आणून टाकला. मृतक रमेश सोदारी हा तेलंगणा राज्यातील फक्का गावात काम करीत होता. तो दसरा सणानिमित्ताने टेकडामोटला येथे आला होता. त्याच्याजवळ काही रक्कम होती. रमेश सोदारी हा रात्रीच्या सुमारास घराबाहेर फिरायला गेला असता, अज्ञात इसमाने त्याचेजवळील रक्कम हिसकावून त्याची हत्या केली, असा संशय मृतकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे.
या घटनेचा पुढील तपास आसरअल्लीचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे टेकडामोटला या गावी खळबळ निर्माण झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Cutting the throats and killing him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.