शिष्यवृत्ती घोटाळा आरोपीला कोठडी
By Admin | Updated: March 21, 2015 01:52 IST2015-03-21T01:52:25+5:302015-03-21T01:52:25+5:30
बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी सुनील मंगर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती घोटाळा आरोपीला कोठडी
गडचिरोली : बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी सुनील मंगर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती घोटाळयाप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यासह जवळपास १३ जणांना अटक केली होती. त्यातील काही जणांची जामीनावर सुटका झाली, तर काही जण न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत. दरम्यान गडचिरोली येथील एका कॉलेजची प्राचार्य दुर्गा मंगर हिचा पती सुनील मंगर यास पोलिसांनी १३ मार्चला अटक केली होती. त्यास आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके, विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, वरिष्ठ लिपिक विजय उकंडराव बागडे व संजय दयानंद सातपुते हे अजनूही न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत. नागपूर उच्च न्यायालयाने याच शिष्यवृत्ती घोटाळ्यात रोहित बोम्मावार, सुरज बोम्मावार, राकेश पेद्दुरवार, विजय कुरेवार यांचाही जामिन फेटाळला आहे. (प्रतिनिधी)