चार वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

By Admin | Updated: September 8, 2014 01:21 IST2014-09-08T01:21:41+5:302014-09-08T01:21:41+5:30

शहरातील भगतसिंग वार्डातील एका चार वर्षीय अल्पवयीन बालिकेवर याच वार्डातील एका ३२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची ...

Cruel torture on a four-year-old child | चार वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

चार वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

देसाईगंज : शहरातील भगतसिंग वार्डातील एका चार वर्षीय अल्पवयीन बालिकेवर याच वार्डातील एका ३२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार भगतसिंग वार्डातील चार वर्षीय बालिका आपल्या घरासमोरील परिसरात खेळत होती. दरम्यान या बालिकेला एकटीच पाहून वामन पगाडे ३२ या नराधमाने वस्तू देण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार या पीडित बालिकेच्या पालकांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात केली. या घटनेसंदर्भात तपासचक्र फिरवीत पोलिसांनी या आरोपीवर बाल सुरक्षा कायद्यांतर्गत रविवारी गुन्हा दाखल केला. सदर घटना चार दिवसापूर्वी घडली असल्याची चर्चा आहे. पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. अटक केलेल्या वामन पगाडे या आरोपीला देसाईगंज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास देसाईगंजचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे करीत आहे. शरमेने मान खाली घालविण्यास लावणाऱ्या या घटनेमुळे देसाईगंज शहरात खळबळ माजली आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक करीत आहे.(वार्ताहर)

Web Title: Cruel torture on a four-year-old child