सीआरपीएफने लावले सौर पथदिवे
By Admin | Updated: February 20, 2016 02:17 IST2016-02-20T02:17:27+5:302016-02-20T02:17:27+5:30
तालुक्यातील ३७ सीआरपीएफ बटालियनने दुर्गम परिसरात असलेल्या गुंडानूर, मुरगल, बागांडिया आदी गावांमध्ये

सीआरपीएफने लावले सौर पथदिवे
दुर्गम गावे प्रकाशणार : ३७ बटालियनचा पुढाकार
भामरागड : तालुक्यातील ३७ सीआरपीएफ बटालियनने दुर्गम परिसरात असलेल्या गुंडानूर, मुरगल, बागांडिया आदी गावांमध्ये सोलर एनर्जीचे एलएडी स्टीट लाईट शुक्रवारी लावलेत.
या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीज पोहोचलेली नव्हती. सीआरपीएफच्या या उपक्रमामुळे गावे प्रकाशमान झाली आहेत. नक्षलग्रस्त भागातील संवेदनशील असलेल्या या गावांमध्ये पथदिवे लावण्यात आल्यामुळे नागरिकांना आता सुविधा उपलब्ध झाली आहे. याप्रसंगी सीआरपीएफचे सहायक कमांडंट लक्ष्मी चंदमीना, सौरव बर्मा, आर. जे. प्रसन्ना, पोलीस निरीक्षक प्रशांत ठाकूर, लाहेरीचे सरपंच आदी उपस्थित होते.
सिव्हीक अॅक्शन कार्यक्रम सन २०१५-१६ अंतर्गत ३७ बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी भरत भूषण जखमोला यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सीआरपीएफच्या माध्यमातून भामरागड तालुक्यात अनेक गावांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे. दुर्गम भागात जनजागृतीही केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)