सीआरपीएफ जवानांनी घेतली भ्रष्टाचारमुक्तीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:05 IST2017-10-30T23:04:57+5:302017-10-30T23:05:13+5:30
सीआरपीएफच्या १९२ बटालियनच्या वतीने सतर्कता-जागरूकता सप्ताह ३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत पाळला जात आहे.

सीआरपीएफ जवानांनी घेतली भ्रष्टाचारमुक्तीची शपथ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सीआरपीएफच्या १९२ बटालियनच्या वतीने सतर्कता-जागरूकता सप्ताह ३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत पाळला जात आहे. या अनुषंगाने पोलीस संकुलातील सीआरपीएफ बटालीयनच्या कॅम्पमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक टी. शेखर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सीआरपीएफ जवानांनी भ्रष्टाचारमुक्तीची शपथ घेतली.
या कार्यक्रमाला बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, मुख्य चिकित्सा अधिकारी वसंत कुंभारे, उपकमांडंट कैलास गंगावणे, उपकमांडंट संध्या राणी उपस्थित होत्या.
सप्ताहदरम्यान बटालीयनच्या वतीने भ्रष्टाचारमुक्तीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्तीबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले जाईल. कार्यक्रमादरम्यान पोलीस उपमहानिरीक्षक टी. शेखर यांनी मार्गदर्शन केले. सतर्कता जागरूकता सप्ताहात भ्रष्टाचारमुक्तीचा संदेश समाजात पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला १९२ बटालीयनचे १२० जवान उपस्थित होते.