सीआरपीएफचा स्थापनादिन साजरा
By Admin | Updated: July 29, 2016 01:14 IST2016-07-29T01:14:24+5:302016-07-29T01:14:24+5:30
प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाजवळ केंद्रीय राखीव पोलीस दल ३७ बटालीयनमध्ये बुधवारी ७७ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

सीआरपीएफचा स्थापनादिन साजरा
अहेरीत कार्यक्रम : वरिष्ठ अधिकारी, जवान उपस्थित
अहेरी : प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाजवळ केंद्रीय राखीव पोलीस दल ३७ बटालीयनमध्ये बुधवारी ७७ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सीआरपीएफतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम व भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पश्चित क्षेत्राचे महानिरीक्षक राजकुमार व बटालीयनचे कमांडंट सतीशकुमार उपस्थित होते. त्यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून सलामी दिली. यावेळी महानिरीक्षक राजकुमार यांना ‘गॉर्ड आॅफ आॅनर’ देण्यात आला.
या कार्यक्रमात राजकुमार यांनी सीआरपीएफच्या गौरवशाली इतिहासावर मार्गदर्शन केले. सीआरपीएफ शिवाय देशाची सुरक्षा व अखंडता अबाधित ठेवता येणार नाही, सीआरपीएफने या कामात नेहमीच अतुलनीय योगदान दिले, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ही परंपरा पुढेही सुरू राहिल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी उपकमांंडंट कुलदीपसिंग खुराणा, सहायक कमांडंट अमितकुमार रंजन, सहायक कमांडंट अशोक रिअल आदींसह जवान व अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)