संचारबंदीतही उसळते गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:39 IST2021-05-08T04:39:14+5:302021-05-08T04:39:14+5:30
गडचिराली: काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही सकाळी ११ वाजेपर्यंत गडचिराेली शहरात नागरिकांची गर्दी उसळते. विशेष ...

संचारबंदीतही उसळते गर्दी
गडचिराली: काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही सकाळी ११ वाजेपर्यंत गडचिराेली शहरात नागरिकांची गर्दी उसळते. विशेष करून इंदिरा गांधी चाैकातील फळांची दुकाने, भाजीपाला बाजार या ठिकाणी बरीच गर्दी राहते. त्यामुळे काेराेनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मुख्य रस्त्यावर अंधार
गडचिराेली: शहरात सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी रस्त्याच्या मधाेमध असलेले पथदिवे काढण्यात आले आहेत. नवीन पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र अजूनपर्यंत ते सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर अंधार पसरला आहे. नवीन पथदिवे लवकर सुरू करण्याची मागणी आहे.
लांजेडावासीयांना मिळते गुंडभर पाणी
गडचिराेली: शहरातील लांजेडा वाॅर्डाला विवेकानंदनगर येथील पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जाते. या ठिकाणच्या पाणी पाईपलाईनला वाॅल्व्ह बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे लांजेडा वाॅर्डात पाणी पाेहाेचेपर्यंत अर्ध्याहून पाणी संपते. परिणामी नागरिकांना पाणीच मिळत नाही.