मार्कंडात उसळली महिला भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:21 IST2017-08-26T23:20:58+5:302017-08-26T23:21:25+5:30

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त शनिवारी महिला भाविकांची गर्दी उसळली.

The crowd of women devotees in Markand | मार्कंडात उसळली महिला भाविकांची गर्दी

मार्कंडात उसळली महिला भाविकांची गर्दी

ठळक मुद्देमनोभावे केली पूजा-अर्चा : महामुनी मार्कंडेय ऋषीचे घेतले दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
मार्र्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त शनिवारी महिला भाविकांची गर्दी उसळली. शनिवारी सकाळपासूनच मार्र्कंडादेव येथे हजारो महिलांनी मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
मार्र्कंडादेव येथे महान ऋषी भगवान मार्र्कंडेयमुनीचे मंदिर असून लाखो भाविकांचे ते श्रध्दास्थान आहे. हजारो महिला भाविकांनी मार्र्कंडादेव येथे येऊन भगवान मार्र्कंडेय मुनीचे दर्शन घेऊन स्त्री जन्माचे सार्थक केले असल्याच्या भावना व्यक्त करीत होत्या. दरवर्षी ऋषी मुनीचे दर्शनी व्हावे, अशी आशा महिला भाविक करीत असतात. ऋषी मुनीच्या दर्शनासााठी शनिवारी पहाटेपासूनच मार्र्कंडेश्वर मंदिरात महिला भाविकांनी रांग लावली होती. वैनगंगा नदी पात्रात स्नान करून पूजा जलाभिषेक व सत्संग, कथा वाचन आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर स्वयंपाक करून देवाला नैवद्य देऊन महिला भाविकांनी आपला उपवास सोडला.
मार्र्कंडेय ऋषी हे महान शिवभक्त असून मृत्यूवर जय मिळविला आहे. त्याचप्रमाणे स्त्रीचे जीवन हे नेहमी मृत्यूजय असते. त्यांच्या जीवनात होणाºया घडामोडी, संकट मातेच्या रूपाने त्यांना नवसंजिवन जीवन प्राप्त होते. म्हणून त्यांच्या आशीवार्दाशिवाय हे शक्य नसते, असा मानस येथे येणाºया अनेक महिला भाविकांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केला. म्हणून आम्ही प्रत्येक ऋषी पंचमीला मार्र्कंडेय ऋषीच्या दर्शनाला येत असतो. हे सर्व काल्पनिक वाटत असले तरी यात सत्यता नाकारता येत नाही. ईश्वरावरील ही अतुट श्रध्दा आहे, हे मात्र विशेष. असे अनेक महिला भाविकांनी सांगितले. याप्रसंगी मार्र्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी योग्य त्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या. भाविकांसाठी येथे २४ तास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत प्रशासनातर्फे करण्यात आली. चामोर्शी पोलीस ठाण्यातर्फे येथे चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापूर्वीही श्रावण महिन्यातील पहिल्या व शेवटच्या सोमवारला मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येथे पुरूष व महिला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मार्र्कंडादेव येथे आता वर्षभर जिल्ह्यासह विदर्भातील भाविकांची मांदियाळी राहते. देवस्थान ट्रस्टच्या वतीने सुविधा दिल्या जातात.

Web Title: The crowd of women devotees in Markand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.