शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

लोकबिरादरी प्रकल्पात रुग्णांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:56 AM

तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात १८ ते २० जानेवारीदरम्यान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध व्याधींनी ग्रस्त रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे लोकबिरादरीच्या परिसरात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी दिसून येत आहे.

ठळक मुद्दे४०० शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट : तीन दिवसीय आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात १८ ते २० जानेवारीदरम्यान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध व्याधींनी ग्रस्त रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे लोकबिरादरीच्या परिसरात रुग्ण व नातेवाईकांची गर्दी दिसून येत आहे.दुर्गम भागातील आदिवासी नागरिक आर्थिक परिस्थितीमुळे खासगी डॉक्टरांकडे उपचार घेऊ शकत नाही. त्याचबरोबर जिल्हा, तालुकास्थळी असलेल्या शासकीय रुग्णालयातही जाऊ शकत नाही. परिणामी सदर रुग्ण हालअपेष्टा सहन करीत जीवन जगत राहतात. अशा रुग्णांसाठी लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने १९८५ पासून शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही तीन दिवस शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे.या शिबिरासाठी ५० ते ६० तज्ज्ञ डॉक्टरांची चमू हेमलकसा येथे दाखल झाली आहे. दुर्गम भागातील नागरिकांबरोबरच छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातीलही रुग्ण हेमलकसा येथे दाखल झाले आहेत.यावर्षी जवळपास ४०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा येत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी लोकबिरादरीचा परिसर फुलून गेला आहे. सदर शिबिराला नागपूर येथील रोटरी क्लब, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने मदत केली आहे. समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या मार्गदर्शनात डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे हे शिबिराची व्यवस्था सांभाळीत आहेत.बबन पांचाळ, संध्या येम्पलवार, गणेश हिवरकर, जगदीश बुरडकर, प्रकाश मायरकार, शारदा ओक्सा, शारदा भसारकर, रमिला वाचामी, सविता मडामी, जुरी गावडे, अरविंद मडावी, शंकर गोटा, सुरेंद्र वेलादी, विनोद बानोत, शांता पोरतेट, माधुरी कोसरे, प्रियंका संगमवार, प्रेमिला मडावी, दीपमाला भगत, प्रियंका सडमेक आदी सहकार्य करीत आहेत. रोटरी क्लबच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य