उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्काराचे निकष बदलले
By Admin | Updated: September 11, 2015 01:45 IST2015-09-11T01:45:05+5:302015-09-11T01:45:05+5:30
ग्रंथालयीन क्षेत्रात देण्यात येणारे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय सेवक, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता या पुरस्कारांच्या अटी, शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे.

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्काराचे निकष बदलले
सार्वजनिक ग्रंथालय : ५० टक्के गुण आवश्यक
गडचिरोली : ग्रंथालयीन क्षेत्रात देण्यात येणारे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय सेवक, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता या पुरस्कारांच्या अटी, शर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे दहा वर्षांतून एकदाच हे पुरस्कार दिले जाणार आहे. उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता, उत्कृष्ट ग्रंथालय सेवक हे पुरस्कार मिळविण्यासाठी आता ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. यासोबतच पुरस्कार मिळविणाऱ्याचा पुढील दहा वर्षे या पुरस्कारासाठी विचार केला जाणार नसल्याबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे.
ग्रंथालय चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट गं्रथालयासह उत्कृष्ट काम करणाऱ्यांना ग्रंथालय सेवक कार्यकर्त्यांनाही पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये अनुक्रमे डॉ. एस. आर. रंगनाथन, उत्कृष्ट कार्यकर्ता सेवक ग्रंथमित्र पुरस्काराचा समावेश आहे. मात्र या पुरस्काराबाबतचे निकष, अटी, शर्ती निवड प्रक्रिया निश्चित करून सुधारित निर्णय घेण्यात आला आहे. अटी, शर्ती व गुणवत्तेच्या निकषाची पूर्तता करणाऱ्या आणि किमान ५० टक्के गुण मिळविणारे सार्वजनिक ग्रंथालये, सेवक कार्यकर्त्यांना या पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. ग्रंथालय सेवक कार्यकर्त्यांचे ज्या वर्षी अर्ज नसतील त्या वर्षी संबंधित पुरस्कार दिला जाणार नाही. दरम्यान या पुरस्कारामुळे ग्रंथालयास प्रोत्साहन मिळते. यासह अधिकाधिक कार्यकर्ते तयार होऊन चळवळ वाढविण्यास मदत होत होती. मात्र शासनाने पुरस्काराच्या अटी व शर्ती कठोर केल्यामुळे ग्रंथालयावर परिणाम होऊ शकतो. संबंधित ग्रंथालयाने प्राथमिक अटी, शर्तीचा भंग केल्यास कारवाईचा इशाराही शासनाने दिला आहे.