शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील सुभगॉन या शेतकरी उत्पादक कंपनीने जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यास सुरूवात ...

ठळक मुद्देअभिनव प्रयोग : शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील सुभगॉन या शेतकरी उत्पादक कंपनीने जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ट्रायकोकार्डची निर्मिती केली जात आहे. ट्रायकोकार्डमुळे उत्पादन खर्च कमी होऊन चांगल्या दर्जाचे शेती उत्पादन होण्यास मदत होणार आहे.धान, सोयाबीन, कापूस व इतर पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. किडींमुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता राहते. कीड मारण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांचा वापर करते. कीटकनाशकांमुळे शेती उत्पादन विषयुक्त बनते. तसेच शेतीचा खर्चही वाढतो. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही कधीकधी कीड नियंत्रणात येत नाही. जैविक कीड नियंत्रण हा सर्वात चांगला उपाय आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यास मदत होते. जैविक कीड नियंत्रणात ट्रायकोकार्डचा वापर हा सर्वात प्रभावी उपाय मानल्या जातो. ट्रायकोकार्डवर ट्रायकोग्रामा या मित्र कीटकाची निर्मिती केली जाते. सदर कार्ड शेतकºयाला नाममात्र किमतीत उपलब्ध करून दिले जाते. ट्रायकोग्रामा हा कीटक पतंगवर्गीय किडींचे अंडी खाते. त्यामुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होते. ट्रायकोकार्डच्या वापरामुळे कीटकनाशकांवरील खर्च कमी होण्यास मदत होते. तसेच कीटकनाशकांचा वापर केला जात नसल्यामुळे शेती उत्पादनाचा दर्जा चांगला राहतो.केंद्रीय अर्थसहाय विशेष अर्थसहायक योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या नावीण्यपूर्ण योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, आत्माचे बीटीएम आकाश लवटे यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम राबविला जात आहे.काय आहे ट्रायकोकार्ड?ट्रायकोग्रामा हा कीटक पतंगवर्गीय किडींचे अंडी खाऊन उपजीविका करतो. तो जवळपास १५० ते २०० प्रकारच्या किडींच्या अंड्यांवर उपजीविका करतो. त्यामुळे या कीटकाला मित्र कीटक असे संबोधले जाते. तसेच ट्रायकोग्रामा हा कीटक इतर किडींच्या अंड्यांमध्ये आपली अंडी घालते. तसेच इतर किडीच्या अंड्यांचा आतला भाग खाऊन मग कोषावस्थेत जाते. त्यामुळे कीड नियंत्रणास फार मोठी मदत होते. भाजीपाल्यावरील फळ आणि खोड पोखरणाºया अळ्या, सूर्यफुलावरील घाटे अळी, धानावरील खोड कीडी, कपाशीवरील बोंड अळी, ट्रायकोग्रामा कीटक फस्त करते.एका एकरासाठी लागते एकच कार्डमुलचेरा शेतकरी उत्पादक कंपनीने ट्रायकोग्रामा कीटकाची अळी बंगलुरू येथून आणली आहेत. त्यांची पैदास वाढविण्याचे काम सुरू आहे. ट्रायकोग्रामा कीटकाने कार्डवर अंडी टाकावी, यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो. ज्या कार्डवर ट्रायकोग्रामा कीटकाची अंडी राहतात, त्याला ट्रायकोकार्ड संबोधले जाते. पोस्टाच्या आकाराच्या कार्डवर सुमारे २० हजार अंडी राहतात. एक कार्ड एका एकरच्या शेतासाठी उपयोगी पडते.

टॅग्स :agricultureशेती