शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:00 AM

शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात.

ठळक मुद्देदेसाईगंज तालुक्यात चार वर्षात ६० शेततळे पूर्णत्वास; खरीप व रबी दोन्ही हंगामात पिकांसाठी ठरताहेत उपयुक्त

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत देसाईगंज तालुक्यात ^‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या कालावधीत एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या संरक्षित सिंचन योजनेमुळे शेतकरी सुखावणार असून उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होत आहे.शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात. धानपिकाला अधिक पाणी लागते. तरीही जिल्ह्यातील शेतकरी जलसिंचनाच्या अत्याधुनिक अशा पद्धतीचा वापर न करता धानपिकाला भरमसाठ पाणी देतात. आवश्यक तेवढेच पाणी धानपिकाला देऊन जास्तीची पाणी शेतात जमा केल्यास तेच पाणी संकटकाळात वापरता येते. ही बाब ओळखून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत ६० शेततळे बांधून सिंचनाची सोय केली आहे.राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अमलात आणली. शेतकऱ्यांनी शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या एकूण ६० कामांना मंजुरी मिळाली. योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १२, २०१७-१८ मध्ये ३, २०१८-१९ मध्ये सर्वाधिक २९ आणि २०१९-२० मध्ये १६ अशा एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळ्यांचे अनुदान मिळाले आहे.मत्स्य व्यवसायाची संधीपाऊस न आल्यास शेततळ्यात साचलेले पाणी पाईप वा नहराद्वारे पिकाला देता येणार आहे. खरीप हंगामाची फसल झाल्यावर शेततळ्यात पाणी शिल्लक राहिल्यास भाजीपाला पिके घेऊन उत्पन्नात भर पाडू शकतो. तर काही शेतकºयांना या शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे. त्यासाठी पाऊस पडल्यावर पाण्याचा योग्य तो निचरा होऊन शेततळ्यात पाण्याची साठवणूक कशी होईल, याचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.सिंचनाची सोय नसलेल्या व निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून पिकांना शेततळ्यातील पाणी फायदेशीर आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन व्यवसायाकडे वळले आहे.आर. एम. वासेकर,कृषी सहाय्यक, विसोराशेततळा बांधल्यामुळे त्यातील पाणी धान पीक शेतीसाठी उपयोगात आले. मत्स्य उत्पादनासाठी मत्स्यबीज सुद्धा टाकले आहे.सुखदेव मुंडले शेतकरी, विसोरा

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प