शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो शिवरायांचे विचार अंगीकृत करून आदर्श समाज निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST

रांगी : छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजेच नव्हते तर खऱ्या अर्थाने रयतेचे श्रद्धास्थान होते. आईवडिलांची आज्ञा शिरोधार्य ...

रांगी : छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजेच नव्हते तर खऱ्या अर्थाने रयतेचे श्रद्धास्थान होते. आईवडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली. त्यांनी स्वधर्माबरोबरच इतर धर्माचाही आदर केला. अशा थाेर महापुरुषाचा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवून सशक्त धर्मनिरपेक्ष समाजाची निर्मिती करावी, असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केले.

नवी रांगी येथे शुक्रवारी शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवाजी चौकात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बाेलत हाेते. कार्यक्रमात आरमोरीच्या मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन बलशाली भारताची निर्मिती करण्यास सहकार्य करावे, असे प्रतिपादन केले. तर प्रा. राजू किरमिरे, शशिकांत साळवे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नवरगावचे ग्रामसचिव के.जी. नेवारे, रांगीचे सचिव वासुदेव बुराडे, सरपंच फालेश्वरी गेडाम, उपसरपंच नूरज हलामी, अर्चना मेश्राम, विद्या कपाट, देवराव कुनघाडकर, अरुण चापले, नरेंद्र भुरसे, प्रा. दादाजी येळणे, श्रीनिवास गणवेनवार, अनिल गणवेनवार, वीणा काटेंगे, किसन आडे, तुळशीराम भुरसे, सुरेश हलामी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन कावळे तर आभार दिनेश चापले यांनी मानले. यशस्वीतेसाठी डाकराज चापले, आकाश देशपांडे, पराग देशपांडे, अरुण पासांडे, विक्रांत पोलोजवार, गणराज कुनघाडकर, मनोहर रोहणकर, नरेश भुरसे, सुधाकर रोहणकर, पुणेश्र्वर जुवारे, अमर चापले, उमाजी चापले, आकाश चापले, कैलास चापले, भारत रोहणकर, आनंदराव पदा, कुलदीप पदा, रुपेश भुरसे, अनिल चापले यांनी सहकार्य केले.