लाखांदूर मार्गावरील खड्ड्याने अपघात वाढले

By Admin | Updated: September 23, 2016 01:27 IST2016-09-23T01:27:12+5:302016-09-23T01:27:12+5:30

शहरातून लाखांदूरकडे जाणाऱ्या मार्गावर कारमेल अकॅडमीलगत मुख्य रस्त्याच्या अगदी मधोमध एक फूट खोल खड्डा पडला आहे.

Crashes on Lakhandur road leads to accidents | लाखांदूर मार्गावरील खड्ड्याने अपघात वाढले

लाखांदूर मार्गावरील खड्ड्याने अपघात वाढले

दोन वर्षांपासून कायम : निवेदनाकडे दुर्लक्ष
देसाईगंज : शहरातून लाखांदूरकडे जाणाऱ्या मार्गावर कारमेल अकॅडमीलगत मुख्य रस्त्याच्या अगदी मधोमध एक फूट खोल खड्डा पडला आहे. सदर खड्डा मागील दोन वर्षांपासून आहे. या खड्ड्यामुळे रात्रीच्या सुमारास अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
खड्डा बुजविण्याबाबत आमगाववासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा निवेदन दिले आहे. मात्र लाखांदूर मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेला असल्याचे सांगून सदर खड्डा बुजविण्यास नकार दिला जात आहे. या रस्त्याबाबतचे निवेदन ज्यावेळी आमगाववासीयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले होते. त्यावेळी सदर मार्ग बांधकाम विभागाकडेच होता. मात्र त्यावेळी सुध्दा या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक राहते. अगदी मध्यभागी खड्डा असल्याने तो चुकविणेही वाहनधारकांना कठीण होते. सदर खड्डा बुजविण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Crashes on Lakhandur road leads to accidents