कडकडीत बंद
By Admin | Updated: April 29, 2015 01:37 IST2015-04-29T01:37:32+5:302015-04-29T01:37:32+5:30
जागो हिंदुस्थान या व्हॉटसअॅप ग्रुपवर सोशल मीडियावर भगवान श्रीकृष्ण यांची आक्षेपार्ह प्रतिमा व मजकूर प्रसारित केल्याचे प्रकरण उघडकीस येताच

कडकडीत बंद
गडचिरोली : जागो हिंदुस्थान या व्हॉटसअॅप ग्रुपवर सोशल मीडियावर भगवान श्रीकृष्ण यांची आक्षेपार्ह प्रतिमा व मजकूर प्रसारित केल्याचे प्रकरण उघडकीस येताच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेच्या नेतृत्वात मंगळवारी शहरात कडकडीत बंद पाळून या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला.
हिंदू देवतांच्या अवमान प्रकरणाबाबत गडचिरोली येथील हेमंत क्रिष्णगोपाल राठी यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात रमाकांत सत्यनारायण कलंत्री यांच्या विरोधात लेखी तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी रमाकांत कलंत्री याचेवर भादंविचे कलम २९५ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
हिंदू देवतांची आक्षेपार्ह प्रतिमा व मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याबाबत जिल्ह्यातील समस्त हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे दोषी आरोपींवर कठोर कारवाई करावी, असेही राठी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. (स्थानिक प्रतिनिधी)