गाईंची मोकळ्या मैदानावर कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:38 IST2021-04-04T04:38:15+5:302021-04-04T04:38:15+5:30

मोदूमडगु येथे वस्तीला लागूनच खूप मोठे मोकळे मैदान आहे. या मैदानाजवळ एक मोहाचे झाड आहे. सध्या मोहफुले पडत ...

Cows slaughtered in the open | गाईंची मोकळ्या मैदानावर कत्तल

गाईंची मोकळ्या मैदानावर कत्तल

मोदूमडगु येथे वस्तीला लागूनच खूप मोठे मोकळे मैदान आहे. या मैदानाजवळ एक मोहाचे झाड आहे. सध्या मोहफुले पडत असल्यामुळे माेहफुले खाण्यासाठी माेठ्या प्रमाणात गाई माेहफुलाच्या झाडाखाली जमा हाेऊन राहतात. याचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने शनिवारी रात्री विनोद भोयर आणि रमेश तेरकरी यांच्या गाई ठार मारल्या. त्यापैकी एका गाईचे बराचसे मांस घेऊन गेले. घटनास्थळावर गायीचे मुंडके, दोन पाय, चामडे व आतडे एवढेच भाग शिल्लक हाेते. जेमतेम ५० फूट अंतरावर दुसरी गाय मृत अवस्थेत पडून होती. तिला तोंडावर जबर मार लागला होता. तिची शिंग तुटून पडली होती. विनोद भोयर आणि रमेश तेरकरी यांनी घटनेची तक्रार अहेरी पोलिसांकडे दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे आणि जनार्दन मडावी पुढील तपास करीत आहेत.

बाॅक्स

पडीक विहिरीत आढळले अवयव

घटनास्थळापासून जवळच एका शेतात पडीक विहीर आहे. या विहिरीमध्ये काही चामडे आणि मृत गाईचे अवयव पडून असल्याचे नागरिकांना आढळून आले. या गावातील अनेक नागरिकांच्या गाई आणि वासरे नेहमीच गायब होत असतात. काेणीतरी या जनावरांची कत्तल करून मांसविक्री करीत असावा असा संशय आहे. त्याचा शाेध घेण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर आहे.

Web Title: Cows slaughtered in the open