गाईचे मांस व दोन वासरे जप्त

By Admin | Updated: February 23, 2016 02:01 IST2016-02-23T02:01:32+5:302016-02-23T02:01:32+5:30

रामनगर परिसरातील पोटेगाव मार्गावर वन विभागाच्या समोर असलेल्या अब्बास शेख याच्या घरून सोमवारी रात्री ७

Cows and two calves are seized | गाईचे मांस व दोन वासरे जप्त

गाईचे मांस व दोन वासरे जप्त

गडचिरोली : रामनगर परिसरातील पोटेगाव मार्गावर वन विभागाच्या समोर असलेल्या अब्बास शेख याच्या घरून सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास पोलिसांनी गाईचे मांस व दोन वासरे जप्त केलीे आहेत.
अब्बास शेख हा गायीचे मांस विकत असल्याची माहिती बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी अब्बास शेखवर पाळत ठेवली होती. सोमवारी सकाळच्या सुमारास त्याच्या वाहनाचा पाठलाग केला व रात्री ७ वाजता याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. पोलिसांनी अब्बास शेखच्या घराची तपासणी केली असता, त्याच्या घरी गाईचे मांस फ्रिजमध्ये ठेवले असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर कत्तल करण्यासाठी आणलेली दोन वासरे, गाय कापण्याचे साहित्यही त्याच्या घरी आढळून आले. पोलिसांनी गाईचे मांस, साहित्य व वासरे जप्त केली व अब्बास शेखच्या विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. अब्बास शेख हा मागील अनेक वर्षांपासून मांस विक्रीचा व्यवसाय करीत आहे. त्यामुळे बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर मागील दोन महिन्यांपासून विशेष नजर ठेवली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Cows and two calves are seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.