उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवले धान

By Admin | Updated: June 30, 2017 01:06 IST2017-06-30T01:06:18+5:302017-06-30T01:06:18+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वडधम येथील आदिवासी विविध कार्यकारी

Cover the tarp of on open and paddy | उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवले धान

उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवले धान

पावसाने लाखोंचे नुकसान होणार : आदिवासी महामंडळाचा भोंगळ कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोचा : आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वडधम येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी खरेदी केलेले लाखो रूपयांचे धान वडधम येथील शेतशिवारात ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहेत. यावरून आदिवासी विकास महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने २०१६ च्या खरीप हंगामात कोट्यवधी रूपयांची धान खरेदी करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळाने यावर्षी काही प्रमाणात खरेदी केंद्रावरून धानाची उचल केली. मात्र सिरोंचा तालुक्यातील वडधम येथील केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात आली नाही. सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास हे धान भिजण्याची शक्यता आहे. ताडपत्री झाकून ठेवली असली तरी वादळाने ही ताडपत्री के व्हाही फाटू शकते. यापूर्वीही उघड्यावरील धान्याची गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान आदिवासी विकास महामंडळास सहन करावे लागले.
गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात आदिवासी विकास महामंडळ तसेच सहकारी संस्थांकडे गोदामाची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे ताडपत्री झाकून उघड्यावर धान ठेवले जाते. उघड्यावर ठेवण्यात आलेल्या धानाच्या चोरीचे प्रकरण धानोरा तालुक्यात उघडकीस आले होते. त्यानंतरही आदिवासी विकास महामंडळाने धडा घेतला नाही. धानाची उचल व भरडाईसंदर्भात आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने ठोस उपाययोजना व कार्यवाही करण्याची गरज आहे. अन्यथा पावसाळ्यात नुकसान होईल.

 

Web Title: Cover the tarp of on open and paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.