नगरसेवक म्हणतात, नगराध्यक्ष करतात दिशाभूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:41 IST2021-08-25T04:41:45+5:302021-08-25T04:41:45+5:30
गटारलाइनचे कंत्राट सुमारे १०० काेटी रुपयांचे आहे. त्यात आठ काेटी रुपयांची तरतूद दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली आहे. तसेच चेंबरमुळे खड्डे ...

नगरसेवक म्हणतात, नगराध्यक्ष करतात दिशाभूल!
गटारलाइनचे कंत्राट सुमारे १०० काेटी रुपयांचे आहे. त्यात आठ काेटी रुपयांची तरतूद दुरुस्तीसाठी ठेवण्यात आली आहे. तसेच चेंबरमुळे खड्डे पडणे ही कंत्राटदाराचीच चूक आहे. असे असतानाही जनतेने कराच्या स्वरूपात नगर परिषदेकडे जमा केलेल्या कराच्या पैशातून म्हणजेच सामान्य फंडातून खड्डे दुरुस्तीचा ठराव नगराध्यक्षांनी मांडला हाेता. हा ठराव चुकीचा व जनतेच्या पैशाचा गैरवापर करणारा हाेता. याला नगरसेवक गुलाबराव मडावी, आनंद श्रुंगारपवार, सतीश विधाते, रमेश चाैधरी, भूपेश कुळमेथे, संजय मेश्राम, अनिता विश्राेजवार, मंजुषा आखाडे, गीता पाेटावी, पूजा बाेबाटे, वर्षा बट्टे आदी नगरसेवकांनी विराेध केला हाेता. पुढेही या बाबीसाठी विराेध कायम राहील, असे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धिपत्रकावर नगरसेवक गुलाबराव मडावी, सतीश विधाते, रमेश चाैधरी, भूपेश कुळमेथे, संजय मेश्राम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.