दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची नगरसेवकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:30+5:302021-02-23T04:54:30+5:30
गडचिराेली : जिल्ह्यातील दारूबंदी काेणत्याही स्थितीत न हटवता दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सिराेंचा व आरमाेरी येथील नगरसेवकांनी ...

दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची नगरसेवकांची मागणी
गडचिराेली : जिल्ह्यातील दारूबंदी काेणत्याही स्थितीत न हटवता दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सिराेंचा व आरमाेरी येथील नगरसेवकांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सिरोंचा नगर पंचायतीच्या १७ नगरसेवकांनी जिल्हा दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे. सोबतच कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. सिरोंचाच्या नगराध्यक्ष मारिया बोल्लमपल्ली, उपाध्यक्ष राजू पेदापल्ली, नगरसेवक संदीप राचर्लावार, सीमा मासल्ला, अब्दुल रफिक, नीलेश गगुरी, मुमताज पठाण, वनिता रालाबंडावार, नरेश अलोणे, सतीश भोगे, सरोजनी मगडी, ईश्वरीबाई बुधावार, नागेश्वर गागापूरवार, रवीकुमार रालाबंडावार, विजयकुमार तोकला, संतोषी परसा, सुनीता गट्टू, आदी १७ नगरसेवकांनी या समर्थन पत्रावर स्वाक्षरी करून जिल्हा दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी दारूबंदी आवश्यक असून, शासनाने दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.
आरमोरी नगर परिषदेच्या १७ नगरसेवकांनीही दारूबंदीला पाठिंबा दर्शविला आहे. आतापर्यंत देसाईगंज २१, अहेरी १८, तर कुरखेडा, एटापल्ली शहरातील प्रत्येकी १७ नगरसेवकांनी दारूबंदी कायम करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदर पंजवानी, नगरसेवक निर्मला किरमे, सागर मने, गीता सेलोकर, भारत बावनथडे, सुनीता चांदेकर, मिलिंद खोब्रागडे, कीर्ती पत्रे, उषा बारसागडे, सुनीता मने, प्रशांत मोटवानी, प्रगती नारनवरे, माणिक भोयर, सिंधू कापकर, दुर्गा लोणारे, विलास पारधी, आदी नगरसेवकांनी दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
बाॅक्स
घोट येथे तंबाखूजन्य पदार्थांची होळी
घोट पोलीस मदत केंद्र व मुक्तिपथ तालुका चमूने गावातील दुकानांची तपासणी करून ४ हजार ५०० रुपयांचा सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. पोलीस ठाण्याच्या आवारात संपूर्ण तंबाखूजन्य पदार्थांची होळी करून सुगंधित तंबाखूची विक्री न करण्याचे दुकानदारांना बजावण्यात आले. घोट येथील दुकानात सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ व घोट पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करण्याचे ठरविले. त्यानुसार गावातील चार दुकानांची तपासणी करण्यात आली. या दुकानातून एकूण ४ हजार ५०० रुपयांचा सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नका अन्यथा कारवाई करू, असेही ठणकावून सांगण्यात आले. यावेळी जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची पोलीस ठाण्याच्या आवारात होळी करण्यात आली. यावेळी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी रोंढे, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल, तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित होते.