कोरोनायोद्धा व सफाई कामगारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:36 IST2021-07-29T04:36:06+5:302021-07-29T04:36:06+5:30

शहरात सर्वत्र कोरोनाची दहशत असूनसुद्धा जिवाची पर्वा न करता सफाई कामगार शहर स्वच्छ करीत होते. नगरपरिषदेच्या आवारात सफाई कामगारांचा ...

Coronary warriors and cleaners felicitated | कोरोनायोद्धा व सफाई कामगारांचा सत्कार

कोरोनायोद्धा व सफाई कामगारांचा सत्कार

शहरात सर्वत्र कोरोनाची दहशत असूनसुद्धा जिवाची पर्वा न करता सफाई कामगार शहर स्वच्छ करीत होते. नगरपरिषदेच्या आवारात सफाई कामगारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून छत्री वाटप करण्यात आले. यावेळी ३००हून अधिक जणांना छत्रींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, गडचिरोली विधानसभा जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, विधानसभा संघटक नंदू कुमरे, सहसंपर्कप्रमुख विलास कोडाप, सहसंपर्कप्रमुख सुनील पोरेड्डीवार, जिल्हा परिषदच्या माजी सभापती छाया कुंभारे, शहरप्रमुख रामकिरीत यादव, माजी नगराध्यक्षा अश्विनी यादव, चामोर्शी तालुकाप्रमुख अमित यासलवार, चामोर्शी तालुकाप्रमुख पप्पी पठाण, राजू अंबानी, पुंडलिक चौधरी, राजू भुसारी, संजय आकरे, वैभव धात्रक, अथर्व कापकर, चेतन कंदुकवार, दत्ता कुमरे, आकाश सुमंतवार, स्वप्निल घोसे, सार्थक खांडरे आदी शिवसैनिक उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.

Web Title: Coronary warriors and cleaners felicitated