Corona victims crossed the three thousand mark | कोरोनाबाधितांनी पार केला तीन हजारांचा टप्पा

कोरोनाबाधितांनी पार केला तीन हजारांचा टप्पा

ठळक मुद्दे१०० जण कोरोनामुक्त : नव्याने १०५ ची भर, गडचिरोलीसह देसाईगंज, अहेरी, एटापल्लीत वाढताहेत रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आटोक्यात येण्याऐवजी वाढतच आहे. शुक्रवारी पुन्हा १०५ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या ३०१२ झाली आहे. पहिल्यांदाच कोरोनाबाधितांच्या आकड्याने ३ हजारांचा टप्पा पार केला आहे.
सध्या क्रियाशिल असणाऱ्या कोरोनाबाधितांपैकी वेगवेगळया तालुक्यातील १०० जण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ८५९ झाली आहे. आतापर्यंत एकुण बाधित ३०१२ रूग्णांपैकी २१३२ जणांनी कोरोनावर मात केली, तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे.
गडचिरोलीमधील १९ नवीन बाधितांमध्ये मारकबोडी १, आरमोरी मार्गावरील २, सीआरपीएफ कॉम्प्लेक्स ४, फुले वार्ड १, कोटगल १, लक्षमीनगर ४, नवेगावमधील १ आणि शहरातील इतर ठिकाणच्या ५ जणांचा समावेश आहे.
अहेरीमधील १७ मध्ये शहरातील ६, रामपूर चौक १, मरपल्ली ६ जणांचा समावेश आहे. आरमोरी येथील सर्व ३ जण शहरातीलच आहेत. भामरागडमधील सर्व ८ जण स्थानिक आहेत. धानोरा येथील १३ मध्ये १० कटेझरी, १ सीआरपीएफ, १ पन्नेमारा, तर पेंढरी येथील एका जणाचा समावेश आहे.
एटापल्लीच्या १९ जणांमध्ये ६ जण सीआरपीएफचे, ७ शहरातील, एलपीसी स्टाफ १, हेडरीमधील ५ जणांचा समावेश आहे. कोरची व कुरखेडा मधील प्रत्येकी एक जण स्थानिकच आहेत. सिरोंचामधील ८ मध्ये सर्वजण स्थानिक आहेत.
देसाईगंजमधील १६ मध्ये राजेंद्र वार्ड १, पिंपळगाव १, चोप २, सीआरपीएफ ५, गांधी वार्ड १, कन्नमवार वार्ड १, कोंढाळा १, कुरु ड १ आणि माता वार्डमधील एका जणाचा समावेश आहे. येथेही आता रुग्णसंख्या वाढत आहे.

तालुकानिहाय असे आहेत नवीन बाधित
नव्याने बाधित झालेल्या १०५ रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १९ जण आहेत. याशिवाय अहेरी तालुक्यातील १७, आरमोरी ३, कोरची येथील १, कुरखेडा येथील १, देसाईगंज १६, एटापल्ली येथील १९, धानोरा १३, भामरागड येथील ८ आणि सिरोंचा येथील ८ अशा १०५ जणांचा समावेश आहे.

यांनी केली कोरोनावर मात
जिल्हाभरात शुक्रवारी १०० जणांनी कोरोनावर मात केली. त्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २८, अहेरी ११, आरमोरी १२, चामोर्शी १०, धानोरा ४, मुलचेरा २, सिरोंचा ७, कोरची ३, कुरखेडा ८, देसाईगंज ११ आणि एटापल्ली 4 अशा एकूण १०० जणांचा समावेश आहे.

उपचार कोण करणार?
कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील रुग्णालये कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांना गृह अलगिकरणात ठेवली जाणार आहे, मात्र हे करताना त्यांच्यावर उपचार कोण करणार, हे मात्र स्पष्ट नाही.

Web Title: Corona victims crossed the three thousand mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.