जिल्ह्यात कोरोना बळींनी ओलांडला ५०० चा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:39 IST2021-05-08T04:39:16+5:302021-05-08T04:39:16+5:30
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २४ हजार ५८७ कोरोनाबाधित झाले. त्यापैकी १९ हजार ६८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४३९४ जणांवर ...

जिल्ह्यात कोरोना बळींनी ओलांडला ५०० चा टप्पा
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २४ हजार ५८७ कोरोनाबाधित झाले. त्यापैकी १९ हजार ६८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४३९४ जणांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मृत्यू झालेल्या १७ रुग्णांमध्ये ४७ वर्षीय पुरुष देलोडा ता.आरमोरी, ६० वर्षीय महिला आलापल्ली ता.अहेरी, ५५ वर्षीय महिला अंकिसा ता.सिरोचा, ४० वर्षीय पुरुष मुडझा ता.गडचिरोली, ६५ वर्षीय पुरुष कोरेगाव ता.वडसा, ७२ वर्षीय पुरुष वडसा, ५२ वर्षीय पुरुष ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर, ५२ वर्षीय पुरुष ता.लाखांदूर जि.भंडारा, ६४ वर्षीय पुरुष लेढारी ता.कुरखेडा, ५० वर्षीय पुरुष कॅम्प एरिया गडचिरोली, ५४ वर्षीय पुरुष अंकिसा ता.सिरोंचा, २८ वर्षीय पुरुष मेढेवाडी ता.आरमोरी, ४० वर्षीय महिला महागाव ता.अहेरी, ४५ वर्षीय पुरुष हेटीनगर ता.कुरखेडा, ४० वर्षीय पुरुष घारगाव ता.चामोर्शी आणि ५० वर्षीय महिला श्रीरामनगर कुरखेडा यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्यूदर २.०६ झाला आहे.
नवीन ४२७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १४६, अहेरी तालुक्यातील ३०, आरमोरी ४४, भामरागड तालुक्यातील १८, चामोर्शी तालुक्यातील ५०, धानोरा तालुक्यातील २०, एटापल्ली तालुक्यातील १७, कोरची तालुक्यातील ०४, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये २८, मुलचेरा तालुक्यातील ९, सिरोंचा तालुक्यातील ३९ तर देसाईगंज तालुक्यातील २२ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ६११ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील १७८, अहेरी ३६, आरमोरी ४३, भामरागड १८, चामोर्शी ३३, धानोरा २५, एटापल्ली ३६, मुलचेरा २२, सिरोंचा ५०, कोरची ४२, कुरखेडा ४१ तसेच वडसा येथील ८७ जणांचा समावेश आहे.