कोरोना संकटकाळात मदत करणारे खरे देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:28 IST2021-06-04T04:28:12+5:302021-06-04T04:28:12+5:30
केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला ७ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने कुरखेडा तालुक्यातील ...

कोरोना संकटकाळात मदत करणारे खरे देवदूत
केंद्रातील भाजपप्रणीत सरकारला ७ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथे बुधवारी कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, संदीप लांजेवार, गेवर्धाच्या सरपंच सुषमा मडावी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद नागपूरकर, तर आभार चांगदेव फाये यांनी मानले.
बाॅक्स
यांचा झाला सत्कार
कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश दामले, डॉ. जगदीश बोरकर, डॉ. राजेश गुलक्षे, डॉ. नारायण टेकाम, आरोग्यसेवक सुरेंद्रसिंह गौतम, अयूब पठाण, आशा वर्कर वनिता बोदेले, गीता कतलाम, रंजना उईके, जास्वंदा नारनवरे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप भांडेकर, सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच ओमप्रकाश बोगा, ग्रामपंचायत सदस्य रोषण सय्यद, हेमंत सिडाम, तसेच सर्व ग्रा. पं. कर्मचारी आदींचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
===Photopath===
030621\img_20210603_110250.jpg
===Caption===
गेवर्धा येथे कोरोना योद्धांचा सत्कार करताना आ आंबडकर आ कृष्णा गजभे