धानोरा येथे रॅलीतून कोरोना जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST2021-02-27T04:48:42+5:302021-02-27T04:48:42+5:30
तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली गावातील प्रमुख मार्गाने फिरवण्यात आली. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, शारीरिक ...

धानोरा येथे रॅलीतून कोरोना जनजागृती
तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली गावातील प्रमुख मार्गाने फिरवण्यात आली. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतर राखावे, विनाकारण घराबाहेर पडू नये,स्वच्छता राखावी,सानिटायझरचा वापर करावा, साबणाने हात धुवावे अशा प्रकारे स्पीकरवरून आवाहन करण्यात आले.
यावेळी रॅलीमध्ये तहसीलदार सी. जी. पितुलवार, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, गटविकास अधिकारी बंडू निमसरकार, मुख्याधिकारी डाॅ. नरेंद्र बेंबरे, नायब तहसीलदार दामोदर भगत, धनराज वाकुलकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर आखाडे तसेच पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती,नगर पंचायतचे कर्मचारी सहभागी होते. कोरोनाची लस निघाल्यापासून लाेक बिनधास्त झाले. नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यामुळे सरकारने काही बंधन लादून सूट दिली त्याचा नागरीकांनी गैरफायदा घेऊन बंधन न पाळता बिनधास्तपणे वावरायला सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाने राज्यात पुन्हा डोके वर काढले. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार, जिल्ह्यात अनेक बंधने आणण्यात आली आहेत.