शांतता राखण्यासाठी सहकार्य करा

By Admin | Updated: September 3, 2016 01:33 IST2016-09-03T01:33:32+5:302016-09-03T01:33:32+5:30

सन उत्सवाच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांबरोबरच नागरिक व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

Cooperate to maintain peace | शांतता राखण्यासाठी सहकार्य करा

शांतता राखण्यासाठी सहकार्य करा

पोलिसांचे आवाहन : अहेरी व देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये शांतता सभा
देसाईगंज/अहेरी : सन उत्सवाच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांबरोबरच नागरिक व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे शांतता राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शांतता सभेदरम्यान केले.
देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची सभा उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के व पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. या सभेला नायब तहसीलदार उपेश अंबादे, विद्युत वितरण अभियंता बोबडे, जयंत शालिग्राम, गट विकास अधिकारी बांगर, जितेंद्र भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. उल्लेखनिय उपक्रम व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळाला विघ्नहर्ता अवार्ड दिला जाईल, अशी माहिती ठाणेदार रवींद्र पाटील यांनी दिली.
अहेरी येथील सभा पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली. पीएसआय निलेश सोळंखे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. उल्लेखनिय उपक्रम व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळाला मागील वर्षीपासून विघ्नहर्ता अवार्ड दिला जाणार आहे. त्याकरिता परीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीछाया तांबूसकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून प्रा. डॉ. निलीमासिंह, प्रकाश दुर्गे, गिरीष मद्देर्लावार, क्रिष्णा मंचार्लावार, जहीर हकीम, टी. चंद्रशेखर यांची निवड झाली. सभेला पीएसआय सी. एन. कोळेकर, संतोष मंथनवार, गणेश राठोड, भाऊराव टपाले यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Cooperate to maintain peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.