खासगी कॉन्व्हेंटवर नियंत्रण ठेवा
By Admin | Updated: December 29, 2014 01:23 IST2014-12-29T01:23:25+5:302014-12-29T01:23:25+5:30
इंग्रजी माध्यमात मुलांना शिक्षण देण्याचे फॅड मोठ्या प्रमाणावर आले आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात गावागावांत कॉन्व्हेंंट उघडण्यावर भर दिला जात आहे.

खासगी कॉन्व्हेंटवर नियंत्रण ठेवा
गडचिरोली : इंग्रजी माध्यमात मुलांना शिक्षण देण्याचे फॅड मोठ्या प्रमाणावर आले आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात गावागावांत कॉन्व्हेंंट उघडण्यावर भर दिला जात आहे. अव्वाच्या सव्वा फी घेऊन विद्यार्थ्यांना प्ले-ग्रूपपासून प्रवेश दिला जात आहे. या कॉन्व्हेंटवर शिक्षण विभागाचे लक्ष असल्याचे दिसत नाही. अनेक पालक आतापासून या कॉन्व्हेंटकडे जाऊन मुला- मुलींच्या प्रवेशासाठी नाव नोंदणी करीत आहेत. फेब्रुवारी महिन्यांपासूनच प्रवेश सुरू होतील, अशी माहिती पालकांना देण्यात येत आहे. काही कॉन्व्हेंटने २ हजार रूपये नगदी व महिना २०० रूपये शुल्क ठेवले आहे. तर काही कॉन्व्हेंट व इंग्रजी शाळांची फी ही १५ हजारांच्या वर आहे. याशिवाय वर्षभर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा खर्च पालकांना करायचे आहे. प्रत्येक कॉन्व्हेंटचा संचालक आम्हाला शासनाची मान्यता आहे, असे छातीठोकपणे सांगत आहे. शहरात व जिल्ह्यात असे किती कॉन्व्हेंट आहेत याची माहिती शिक्षण विभागाने जाहीर करावी, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील पालकांनी केली आहे. याविरूद्ध तत्काळ शिक्षण विभागाने कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.