सीआरपीएफच्या वतीने शौचालय बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:41 IST2017-03-06T00:41:33+5:302017-03-06T00:41:33+5:30
तालुक्यातील कन्हारटोला येथे सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या वतीने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून दिले.

सीआरपीएफच्या वतीने शौचालय बांधकाम
स्वच्छता बाळगण्याचे आवाहन : कन्हारटोलात सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण
धानोरा : तालुक्यातील कन्हारटोला येथे सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या वतीने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून दिले.
सार्वजनिक शौचालयाच्या लोकार्पणाप्रसंगी ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकरा, उपकमांडंट सपनकुमार, निरिक्षक साबूजी, निरिक्षक हरिरामायन, धानोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक वाघमारे, नवले, वडसंग, वर्षा चिमुरकर, सरपंच विनोद लेणगुरे, पोलीस पाटील बाबुराव उईके, जयपाल उईके, मनिराम कुमोटी, देवराम हलामी, रजन उईके, महेंद्र उईके, किशोर उईके, संजय हलामी, अजय हलामी आदी मान्यवर उपस्थित होते. सीआरपीएफचे कमांडंट एन. शिवशंकरा यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कमांडंट शिवशंकरा म्हणाले की, दुर्गम भागातील नागरिकांच्या विकासासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गाव व परिसरात स्वच्छता बाळगावी. प्रत्येक नागरिकाने शौचालयाचा वापर करावा, असे आवाहन गावकऱ्यांना केले. कार्यक्रमाला कन्हारटोला येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.