पातागुड्डममध्ये पोलीस ठाणे निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 01:29 IST2016-03-03T01:29:04+5:302016-03-03T01:29:04+5:30
महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमेवर सिरोंचा तालुक्यातील पातागुड्डम येथे नवीन पोलीस चौकीच्या निर्माणासाठी शासनाने निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणला.

पातागुड्डममध्ये पोलीस ठाणे निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू
कलेक्टर, एसपी पोहोचले : हेलिकॉप्टर व आधुनिक वाहनाने ताफा आला
सिरोंचा : महाराष्ट्र- छत्तीसगडच्या सीमेवर सिरोंचा तालुक्यातील पातागुड्डम येथे नवीन पोलीस चौकीच्या निर्माणासाठी शासनाने निर्णय प्रत्यक्ष कृतीत आणला. त्यानुसार गडचिरोली पोलीस बांधकाम साहित्यासह इंद्रावती नदीच्या काठावर पोहोचले.
यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार व पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मोक्यावर उपस्थित होते. तीन राज्याच्या अंतिम सीमेवरील घनदाट जंगलात पोहोचल्यावर आसमंतात हेलिकॉप्टर तर भूतल मार्गावर आधुनिक वाहनांचा ताफा सोबतीला स्वयंचलित शस्त्रधारी पोलीस जवानांचे पथक देशाच्या सीमेवरील युद्धजन्य स्थितीचा आभास निर्माण करणारे हे वीरश्रीयुक्त वातावरण गडचिरोली पोलिसांच्या या शक्तीप्रदर्शनाने सीमावर्ती राज्यातील नागरिक व प्रशासनही दणाणून गेले. मागील तीन दिवसांपासून जिकडे- तिकडे या बाबीची चर्चा सुरू आहे. हा भाग सिरोंचा तालुक्यातील नक्षली कारवायांच्या दृष्टिने संवेदनशील भाग आहे. पोलीस ठाण्याच्या निर्मितीने नक्षली कारवायांवर आळा बसणार आहे. (तालुका प्रतिनिधी)