लोकवर्गणीतून किचन शेडचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:09+5:30

आष्टी येथील साई मंदिराच्या सभागृहाला लागून २५ बाय ११ आकाराच्या जागेवर सदर किचन शेडचे २७५ चौरस मीटर फुटाचे बांधकाम सुरू आहे. सदर किचन शेडच्या कामासाठी अस्मिता भिमनवार व मिलींद पाटील यांनी मोलाची आर्थिक मदत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव पंदीलवार यांनी स्वत: बांधकामाचा खर्च देण्याचे कबूल केले असून त्यांच्या सहकार्याने किचन शेडचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांचे या कार्यासाठी योगदान मिळत आहे.

Construction of kitchen shed from the crowd | लोकवर्गणीतून किचन शेडचे बांधकाम

लोकवर्गणीतून किचन शेडचे बांधकाम

Next
ठळक मुद्देआष्टी येथील साई मंदिरात एक लाख रुपयांतून बांधकाम प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : येथील साई शिक्षक कॉलनीमधील साई मंदिरामध्ये लोकवर्गणीच्या पैशातून किचन शेड बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. या कामाला एक लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथे येणाऱ्या भाविकांसाठी सदर किचन शेड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आष्टी येथील साई मंदिराच्या सभागृहाला लागून २५ बाय ११ आकाराच्या जागेवर सदर किचन शेडचे २७५ चौरस मीटर फुटाचे बांधकाम सुरू आहे. सदर किचन शेडच्या कामासाठी अस्मिता भिमनवार व मिलींद पाटील यांनी मोलाची आर्थिक मदत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव पंदीलवार यांनी स्वत: बांधकामाचा खर्च देण्याचे कबूल केले असून त्यांच्या सहकार्याने किचन शेडचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच देवस्थान कमिटीच्या सर्व सदस्यांचे या कार्यासाठी योगदान मिळत आहे.
सदर मंदिराजवळ विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून याचा खर्च गजानन ताजने व मिलींद पाटील यांनी उचलला आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या या साई मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. याशिवाय साक्षगंध, वाढदिवस व इतर छोटे-मोठे कार्यक्रमही आयोजित केले जातात. किचन शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध कार्यक्रमानिमित्त करण्यात येणाºया स्वयंपाकाची अडचण मार्गी लागणार आहे. येथे प्रशस्त किचन शेड तयार होत असून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. शनिवारला साई मंदिराचा स्थापन दिवस साजरा करण्यात आला. सदर साई मंदिर आष्टी व परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान बनले आहे.

कोरोनामुळे मंदिर कुलूपबंदच
कोरोनाच्या संचारबंदीच्या काळात चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील सर्व मंदिर कुलूपबंद आहेत. मंदिरात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूने आष्टी येथील साई मंदिर कुलूपबंद ठेवण्यात आले आहे. शेड बांधकामासाठी कामगार येथे काम करतात. मात्र भाविकांसाठी या मंदिरात प्रवेश नाही. त्यामुळे आष्टी शहर व परिसरातील साई भक्तांना घरीच पूजाअर्चा करावी लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथील मंदिर सुद्धा कुलूपबंद आहे.
 
Web Title: Construction of kitchen shed from the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.