हेमाडपंथी मंदिराच्या जागेची मोजणी करूनच बांधकाम करा

By Admin | Updated: December 16, 2015 01:47 IST2015-12-16T01:47:05+5:302015-12-16T01:47:05+5:30

तालुक्यातील ठाणेगाव येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिराचे तसेच संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू झालेले नाही.

Construction of Hemadpanthi temple by computing it | हेमाडपंथी मंदिराच्या जागेची मोजणी करूनच बांधकाम करा

हेमाडपंथी मंदिराच्या जागेची मोजणी करूनच बांधकाम करा

तहसीलदारांना निवेदन : ठाणेगावच्या ग्रामस्थांची मागणी
आरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिराचे तसेच संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू झालेले नाही. पुरातत्त्व विभागाला गावकऱ्यांनी वारंवार दस्तावेजाची मागणी करूनही पुरातत्त्व विभागाने दस्तावेज न देता बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे हेमाडपंथी मंदिराला असलेल्या जागेची पूर्ण मोजनी करूनच बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ठाणेगाव येथील नागरिकांनी तहसीलदार मनोहर वलथरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जोपर्यंत दस्तावेज उपलब्ध करून दिले जात नाही. तसेच मंदिराच्या जागेची मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बांधकाम बंद ठेवावे, असा पवित्रा अनेक दिवसांपासून नागरिकांनी घेतला आहे. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांनी हेमाडपंथी मंदिराला भेट दिली नाही. मंदिराचे बांधकाम मस्के यांच्या देखरेखेखाली होत असून सुरूवातीला मंदिराची व सभोवतालची जागा पाहण्याकरिता ते आले असता, त्यांनी मंदिरासमोर लावलेल्या बोर्डावर १०० बाय २०० मीटर जागा ही मंदिराची असते त्यात कोणालाही खोदकाम करता येत नाही. त्यामुळे त्यांनीच गावकऱ्यांना सांगितले की, सदर जागा कोणाच्या ताब्यात असेल ती पुरातत्त्व विभागाकडून जुना रेकॉर्ड आणून मंदिराच्या सूपुर्द करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे मंदिराच्या जागेची मोजणी करूनच बांधकाम करावे, अशी मागणी जि. प. सदस्य लक्ष्मी मने, कुसूम रणदिवे, पं. स. सदस्य नानू चुधरी, सचिन महाजन, भास्कर चिचघरे, उद्धव बनकर, सुरेश लठ्ठे, सुधाकर राऊत, देवराव नंदरधने, मोंगरकर, पुंजिराम मेश्राम उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Construction of Hemadpanthi temple by computing it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.