शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राकाँच्या अटीने काँग्रेसची कोंडी

By admin | Updated: March 2, 2017 02:04 IST

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसकडून वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे संपर्क करण्यात येत होता.

आविसंने दोघांना सोडून पद द्यावे : -तर आम्ही जि. प.च्या सत्तेत सोबत येऊ गडचिरोली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसकडून वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे संपर्क करण्यात येत होता. आदिवासी विद्यार्थी संघाला सोबत घेऊन जि. प. मध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने सोबत यावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. मात्र राष्ट्रवादीने आविसंला सत्तेत सोबत घेताना जि. प. सभापती अजय कंकडालवार व जि. प. सदस्य अनिता आत्राम कोणतेही पद जिल्हा परिषदेत घेणार नाही, असे ठामपणे सांगा व याची शाश्वती द्या, त्यानंतरच आम्ही तुमच्यासोबत येण्याबाबत तयार आहो, अशी अट काँग्रेससमोर घातली असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र काँग्रेसने राकाँच्या या अटीला दुर्लक्षित केले आहे व आविसंने कुणाला पदे द्यायची, हा पूर्णत: त्यांचा प्रश्न आहे, असे सांगून या प्रश्नावर हात वर केले आहे. या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जवळ करण्याचा निर्णय घेतला व तशी माहिती काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला त्याच दिवशी दिली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जबाबदार नेत्याने लोकमतशी बोलताना दिली. अहेरी विधानसभा क्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत आदिवासी विद्यार्थी संघ आता भविष्यात वाढायला नको, याची पूर्ण काळजी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा ना. अम्ब्रीशराव आत्राम गट घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आविसंचे समिकरण जि. प. च्या सत्तेसाठी जुळून येण्यास अडचण निर्माण झाली आहे. भाजपच्याही एका वर्तुळाने आदिवासी विद्यार्थी संघाच्या जि. प. सदस्यांचा भाजप प्रवेश करून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना शह देण्याचा प्रयत्न चालविला होता व तशी बोलणीही सुरू झाली होती. मात्र भाजपच्या संघ वर्तुळातील लोकांनी पक्षातीलच आत्रामविरोधक लोकांचा हा डाव हाणून पाडल्याने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन जि. प. मध्ये सत्ता स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ सदस्यांशी पालकमंत्र्यांनी स्वतंत्र चर्चा करून त्यांचेही मन या आघाडीसाठी वळविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या ज्येष्ठ सदस्यांचे पूर्ण समाधान पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर झाले व त्यानंतरच भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीवर अखेरचा शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसचे संख्याबळ २२ सदस्यांपर्यंतच पोहोचेल, अशी चिन्ह आहे. अपक्ष सदस्य अतुल गण्यारपवार व ग्रामसभांच्या दोन सदस्यांनी अजूनही पाठिंब्याबाबत आपले पत्ते खुले केलेले नाही. त्यामुळे ते कुणाच्या बाजुने जातात, हे मतदानाच्या वेळेवरच कळेल. मात्र सत्ता पक्षाच्या बाजुचे संख्याबळ वाढण्याचीच दाट शक्यता आहे, असे भाजपचे लोक सांगत आहे. भाजपच्या राज्यस्तरावरील नेतृत्वानेही गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सर्व प्रयत्न करण्याची मुभा स्थानिक नेत्यांना दिलेली आहे. त्यामुळे भाजप-राकाँचा राजमार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)