काँग्रेसच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन
By Admin | Updated: September 12, 2016 01:59 IST2016-09-12T01:59:56+5:302016-09-12T01:59:56+5:30
जिल्हा काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गणरायाची स्थापना करण्यात आली.

काँग्रेसच्या गणरायाचे उत्साहात विसर्जन
भाविकांना महाप्रसाद वितरण : विजय वडेट्टीवार यांनी घेतले गणेशाचे दर्शन
गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात गणरायाची स्थापना करण्यात आली. रविवारी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे भेट देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले. सायंकाळी महाप्रसाद वितरणानंतर ढोल-ताशाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. त्यानंतर गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, माजी प्रदेश सदस्य सगुणा तलांडी, लता पेदापल्लीवार, हरबाजी मोरे, सुनिल वडेट्टीवार, सुनिल पोरेड्डीवार, संजय वानखेडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)