गडचिरोलीत बैठक : बाला बच्चन यांनी केले नेत्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शनगडचिरोली : आगामी काळात नगर पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या निवडणुका असल्याने ग्रामीण व शहरी भागात काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे महाराष्ट्राचे सहायक प्रभारी बाला बच्चन यांनी गडचिरोली येथे बैठक घेऊन काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी गटबाजी बाजुला ठेवून पक्षहिताचे विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे सहसचिव मुन्ना ओझा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी अध्यक्ष प्रकाश इटनकर, पंकज गुड्डेवार, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अतुल मल्लेलवार, जि.प. सदस्य केसरी उसेंडी, मनोहर पोरेटी, अॅड. गजानन दुगा, तालुका अध्यक्ष शंकरराव सालोटकर, नरेंद्र भांडेकर, राजेश ठाकूर, सुनिल वडेट्टीवार, सभापती देवेंद्र भांडेकर, प्रभाकर वासेकर, सुनिल खोब्रागडे, अमिता मडावी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, सोशल मीडियाचे अध्यक्ष नंदू वाईलकर, धानोरा पं.स. सभापती कल्पना वड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. उसेंडी यांनी काँग्रेस पक्ष संघटनेचा आढावा मान्यवरांसमोर सादर करून पक्षाने नगर पंचायतीत मिळविलेल्या घवघवीत यशाची माहिती विशद करून आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचे सांगितले. (नगर प्रतिनिधी)
काँग्रेस देणार पुनर्बांधणीवर भर
By admin | Updated: March 1, 2016 00:58 IST