काँग्रेस सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार
By Admin | Updated: September 7, 2015 01:30 IST2015-09-07T01:30:35+5:302015-09-07T01:30:35+5:30
काँग्रेस नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढणार असून सर्वच जागा पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जाणार आहेत.

काँग्रेस सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार
चामोर्शी नगर पंचायत निवडणूक : विजय वडेट्टीवार यांची कार्यकर्ता बैठकीत घोषणा
चामोर्शी : काँग्रेस नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढणार असून सर्वच जागा पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जाणार आहेत. सर्व शक्ती पणाला लावून काँग्रेस चामोर्शी नगर पंचायतीवर एकहाती सत्ता मिळविणार, अशी घोषणा काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली.
येथील जयसुखलाल दोषी यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत आ. वडेट्टीवार बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, माजी पं.स. उपसभापती अशोक तिवारी, प्रफुल रामटेके, माजी पं.स. सदस्य वैभव भिवापुरे, माजी उपसरपंच नितीन वायलालवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद खोबे, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य चंद्रकांत दोषी, शामराव लटारे, माजी ग्रा.पं. सदस्य विजय शातलवार, सुमेध तुरे, राहूल नैताम, राजेश्वर पिपरे, निशांत नैताम आदी उपस्थित होते. आ. वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेस सर्वसामान्यांचा विचार करून निश्चित दिशा ठरवून विकास घडवून आणणारा पक्ष आहे. चामोर्शी शहराचा विकास केवळ काँग्रेसची विचारसरणी घेऊन उभा ठाकणारा कार्यकर्ताच करू शकतो, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याने काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.(तालुका प्रतिनिधी)