अंतरगाव व शिरपूर ग्रामपंचायतींवर काँग्रेस पुरस्कृत गटाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:22+5:302021-02-23T04:54:22+5:30
कुरखेडा : गट ग्रामपंचायत अंतरगाव येथे सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत गटाने वर्चस्व मिळविले. सरपंचपदी सुमन बंडू नैताम, ...

अंतरगाव व शिरपूर ग्रामपंचायतींवर काँग्रेस पुरस्कृत गटाचे वर्चस्व
कुरखेडा : गट ग्रामपंचायत अंतरगाव येथे सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत गटाने वर्चस्व मिळविले. सरपंचपदी सुमन बंडू नैताम, तर उपसरपंचपदी अमित पांडुरंग गावळे यांची निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य विश्वनाथ हलामी, ज्ञानेश्वर मेश्राम, देवीदास वाढई, प्रमिला भोयर, गीता कोल्हे, प्रतिभा हलामी, प्रमिला वाढई आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांनी विजयाचा जल्लाेष साजरा केला.
शिरपूरच्या सरपंचपदी मडावी, तर उपसरपंचपदी दुमाने
गट ग्रामपंचायत शिरपूर येथे सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत रऊफ शेख गटाने वर्चस्व मिळविले. सरपंचपदी कुरेशा मडावी, तर उपसरपंचपदी भाविका दुमाने यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य चरणदास आळे, यास्मीन शेख, छाया इंदूरकर आदींची उपस्थिती होती. निवड प्रक्रिया पार पडताच सत्ताधारी गटाचे प्रमुख रऊफ शेख, रूपन आळे, रुखसार शेख, वहाब शेख, आदाजी आळे, ललेश्वर लोणारे, लहरीदास बोरकर, तानाबाई करंगाम, विस्तारी सहारे, गोविंदराव हलामी, युवराज आळे, वनिता नरोटे, उपासराव सलाम व गावकऱ्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.
सोनसरी ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा कब्जा
कुरखेडा तालुक्यातील साेनसरी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलने वर्चस्व मिळविले. सरपंचपदी मीनाक्षी वटी, तर उपसरपंचपदी झुनुकलाल चौधरी यांची निवड झाली.
सोनसरी ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ राेजी झाली. तेव्हापासून येथे महिला सरपंच विराजमान झाल्या नव्हत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत १७ फेब्रुवारीला पार पडलेल्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत पहिल्या महिला सरपंच हाेण्याचा मान मीनाक्षी वटी यांना मिळाला, तर उपसरंचपदी झुनुकलाल चौधरी हे विजयी झाले. त्यांना ९ पैकी ५ मते मिळाली. याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य मनोज हलामी, रेवता पुराम, ममता गोटा यांनी मतदान केले. याप्रसंगी माधव दहीकर, राजू रामटेके, पुष्पलता मासरकर, संतलाल हिलको, अशोक हलामी, प्रकाश गोटा, अंताराम हलामी, भाईचंद वटी, प्रल्हाद गोटा, सुखदेव हलामी आदींची उपस्थिती हाेती.