आलापल्लीत काँग्रेसचा मेळावा
By Admin | Updated: September 21, 2015 01:24 IST2015-09-21T01:24:36+5:302015-09-21T01:24:36+5:30
स्थानिक विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

आलापल्लीत काँग्रेसचा मेळावा
अनेकांचा प्रवेश : पक्ष मजबूत करण्याचे आवाहन
आलापल्ली : स्थानिक विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
सदर मेळाव्याचे आयोजन विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विजय वडेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस प्रदेश कार्यकारीणी सरचिटणीस सगुणा तलांडी, माजी आमदार पेंटारामा तलांडी, अॅड. राम मेश्राम, प्रभूदास आत्राम, मनोहर हिचामी, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, ऋषी पोरतेट, संजय चरडुके, निलेश राठोड, विजय कोलपाकवार, मालू बोगामी, मुस्ताक हकीम, चंदू बेझलवार, स्वप्नील श्रीरामवार, सलिम शेख, अज्जू पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार यांनी या भागात प्रचंड प्रमाणात मागासपणा असून काँग्रेस सत्तेत आल्यास मागसपणा दूर करण्यासाठी आपण हा भाग दत्तक घेऊ. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून प्रचंड मतांनी निवडून दिले. परंतु १८ महिन्यांच्या काळात त्यांनी काहीही केले नाही. सूरजागड प्रकल्प सुरू झाला तर प्रकल्प येथेच उभारावा, अशी आपली ठाम भूमिका आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.
मेळाव्यादरम्यान सिरोंचा तालुक्यातील पाच, एटापल्ली २०, मुलचेरा तीन, भामरागड १०, अहेरी तालुक्यातील १० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन संतोष आत्राम यांनी केले.
मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी वडेट्टीवार यांना विचारले असता, सदर निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)