जिल्हाध्यक्ष हटविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सरसावले

By Admin | Updated: July 6, 2014 23:55 IST2014-07-06T23:55:45+5:302014-07-06T23:55:45+5:30

जिल्हा काँग्रेस कमेटीचे प्रभारी अध्यक्ष हसनअली गिलानी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीला घेऊन चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस

The Congress party activists have been removed to remove the district president | जिल्हाध्यक्ष हटविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सरसावले

जिल्हाध्यक्ष हटविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सरसावले

गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमेटीचे प्रभारी अध्यक्ष हसनअली गिलानी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीला घेऊन चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना नुकतेच भेटले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षासमोर हसनअली गिलानी यांच्या निष्क्रिय कार्यपध्दतीचा पाढा वाचला.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला नाही, जिल्ह्यातील बुथ प्रतिनिधींची यादी प्रदेश काँग्रेसला देण्यात आली. मात्र लोकसभा निवडणुकीत अनेक बुथवर प्रतिनिधीच नव्हते. गडचिरोली शहरात असलेले पक्षाचे कार्यालय नेहमी बंद राहते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची कामे होत नाही. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत नगरसेवक नंदू कायरकर यांना विरोधात मतदान करण्याची सूचना जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी यांनी केली. अशा जिल्हाध्यक्षांच्या कार्यपध्दतीमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार आमदार डॉ. उसेंडी माघारले. याला जिल्हाध्यक्षांची कार्यपध्दती कारणीभूत आहे. शिष्टमंडळाने मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याशी बऱ्याचवेळ पक्ष संघटनाबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांची तीव्र भावना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासमोर मांडली. शिष्टमंडळात प्रदेश सदस्य विनोद शनिवारे, प्रदेश सचिव सगुना पेंटारामा तलांडी, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, जि.प. सदस्य जीवन नाट, लंकेश भोयर, पं.स. सभापती कल्पना वड्डे, पं.स. उपसभापती देवेंद्र भांडेकर, शहर अध्यक्ष सुनिल डोगरा, नंदू कायरकर, नगरसेविका लता मुरकुटे, पुष्पा कुमरे, निलोफर शेख, अतुल मल्लेलवार, राजेश आकरे, प्रेमानंद वाईलकर, नरेंद्र भरडकर, किशोर चापले, नेताजी गावतुरे, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे, तुळशिराम भोयर, महेंद्र करकाडे आदी उपस्थित होते.

Web Title: The Congress party activists have been removed to remove the district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.