पं.स.वर काँग्रेसचाच वरचष्मा

By Admin | Updated: March 15, 2017 01:54 IST2017-03-15T01:54:15+5:302017-03-15T01:54:15+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील १२ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली.

Congress only overwhelms me | पं.स.वर काँग्रेसचाच वरचष्मा

पं.स.वर काँग्रेसचाच वरचष्मा

तीन पं.स.वर भाजपचे वर्चस्व : आरमोरीत काँग्रेस शिवसेनेसोबत तर मुलचेरात भाजपसोबत
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील १२ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांवर काँग्रेसचे तर तीन पंचायत समित्यांवर भाजप व दोन पंचायत समित्यांवर राकाँचे सभापती विराजमान झाले आहेत. अहेरी पंचायत समिती आविसंने राखली असून भामरागड पंचायत समितीवर अपक्षांनी कब्जा केला आहे. काँग्रेसने कोरची, कुरखेडा, आरमोरी, मुलचेरा, गडचिरोली या पंचायत समित्यांवर यश मिळविले आहे. तर भाजपने देसाईगंज, धानोरा व चामोर्शी या पंचायत समित्यांवर कब्जा केला आहे. तर एटापल्ली, सिरोंचा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व ठेवले आहे.

कोरची पं.स.मध्ये काँग्रेसच्या कचरीबाई प्रेमलाल काटेंगे सभापती पदी ईश्वरचिठ्ठीने निवडून आल्या तर उपसभापती पदी श्रावणकुमार शिवरूराम मातलाम हे ही ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. चार सदस्यसंख्या असलेल्या या पंचायत समितीमध्ये काँग्रेसला दोन, भाजपला एक व शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. ईश्वरचिठ्ठीने निवड झाली व काँग्रेसला दोन्ही जागा मिळाल्या.
कुरखेडा पंचायत समितीच्या सभापती पदावर काँग्रेसचे गिरीधारी तितराम तर उपसभापती पदावर मनोज दुनेदार सहा विरूध्द चार मतांनी निवडून आले. काँग्रेसचे येथे १० पैकी ६ सदस्य असून पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत गिरीधारी तितराम यांनी अपक्ष श्रीराम दुगा यांचा सहा विरूध्द चार मतांनी पराभव केला तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मनोज दुनेदार यांनी भाजपचे बौध्दकुमार लोणारे यांचा दोन मतांनी पराभव केला. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अजय चरडे यांनी काम पाहिले. पं.स.वर काँग्रेसचा झेंडा फडकताच शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे, जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट, देसाईगंजचे तालुका अध्यक्ष परसराम टिकले, नगरसेवक आरिफ खानानी, निताराम कुमरे, आनंदराव जांभुळकर, तुकाराम मारगाये, दामोधर वट्टी, बबलु शेख, निजाम शेख, नगरसेवक उस्मान पठाण, मनोज सिडाम, ताहेर मुगल आदी उपस्थित होते.
देसाईगंज पंचायत समितीवर सहाही सदस्य भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे येथे सभापतीपदी मोहन गायकवाड तर उपसभापती पदी गोपाळ उईके अविरोध निवडून आले. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, मोतीलाल कुकरेजा, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, राजू जेठाणी आदी उपस्थित होते.
आरमोरी येथे सभापती पदी काँग्रेसच्या बबीता उसेंडी तर उपसभापती पदी शिवसेनेचे यशवंत सुरपाम निवडून आलेत. आठ सदस्य संख्या असलेल्या आरमोरी पंचायत समितीमध्ये काँग्रेस चार, भाजपा तीन व शिवसेना एक असे संख्याबळ आहे. मंगळवारी येथे पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. काँग्रेसकडून सभापती पदासाठी बबीता उसेंडी यांनी तर भाजपाकडून सभापती पदासाठी रूपमाला वट्टी यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. यात काँग्रेसच्या बबीता उसेंडी यांना पाच मते मिळाली तर भाजपच्या रूपमाला वट्टी यांना तीन मते मिळाल्याने सभापती पदी काँग्रेसच्या बबीता उसेंडी निवडून आल्या. उपसभापती पदासाठी शिवसेनेचे यशवंत सुरपाम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसभापती पदी अविरोध निवड झाली. आरमोरी पंचायत समितीवर काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन आपला झेंडा फडकविला आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार मनोहर वलथरे यांनी काम पाहिले. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, तालुका अध्यक्ष किशोर वनमाळी, आनंदराव आकरे, बबुजी ताडाम, लक्ष्मी मने, वेणू ढवगाये, श्रीनिवास आंबटवार, प्रा. शशीकांत गेडाम, सुभाष सपाटे, मेघा मने, तुळशीदास काशीकर, उदाराम सहाकाटे, दत्तू सोमनकर, राम मने, हारेंद्र भजभुजे, मोहन भुते, रवी चापले, रवीेंद्र खेवले आदी उपस्थित होते.
गडचिरोली पंचायत समितीत सभापती पदी काँग्रेसच्या दुर्लभा कैलाश बांबोळे यांची अविरोध निवड झाली. त्या एकमेव पात्र उमेदवार होत्या. तर रासपकडून निवडून आलेले विलास केशवराव दशमुखे यांची भाजपच्या पाठींब्याने उपसभापती पदी निवड झाली. उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जान्हवी तुळशीदास भोयर व विलास केशव दशमुखे यांनी अर्ज दाखल केले होते. दशमुखे यांना सहा तर भोयर यांना तीन मते मिळाली. एक सदस्य अनुपस्थित राहिला.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपचे आनंद भांडेकर तर उपसभापती पदी आकुर्लीबाई बिश्वास यांची निवड झाली. सभापती पदासाठी भाजपचे आनंद भांडेकर व काँग्रेसचे शंकर आक्रेडीवार यांनी अर्ज भरला होता. आनंद भांडेकर यांना सर्वाधिक १३ मते मिळाली तर आक्रेडीवार यांना पाच मते मिळाली. भांडेकर विजयी झालेत. उपसभापती पदाच्या निवडणुकीत आकुर्लीबाई दुलाल बिश्वास यांना १३ तर काँग्रेसच्या धर्मशीला प्रमोद साखरे यांना पाच मते मिळाली. भाजपच्या आकुलीबाई बिश्वास या विजयी झाल्या. शिवसेनेचा एक व रासपच्या दोन सदस्यांनी काँग्रेसच्या बाजुने मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अरूण येरचे यांनी काम पाहिले. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार एस. आर. तनगुलवार व प्रविण आदे यांनी सहकार्य केले. निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, निवडणूक निरिक्षक प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, स्वप्नील वरघंटे, प्रकाश गेडाम, दिलीप चलाख, रोशनी वरघंटे माधवी पेशेट्टीवार, केशव भांडेकर, मनमोहन बंडावार, दिलीप चलाख, माणिक कोहळे, अतुल भिरकुंडवार, प्रकाश सातपुते,

Web Title: Congress only overwhelms me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.