काँग्रेस नेते श्यामलाल मडावी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:26 IST2021-07-15T04:26:08+5:302021-07-15T04:26:08+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद सांभाळत हाेते. याशिवाय त्यांनी काेरची पंचायत समितीचे पहिले सभापती, ग्रामपंचायतीचे सरपंच, नगरपंचायतीचे ...

Congress leader Shyamlal Madavi passes away | काँग्रेस नेते श्यामलाल मडावी यांचे निधन

काँग्रेस नेते श्यामलाल मडावी यांचे निधन

गेल्या अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद सांभाळत हाेते. याशिवाय त्यांनी काेरची पंचायत समितीचे पहिले सभापती, ग्रामपंचायतीचे सरपंच, नगरपंचायतीचे नगरसेवक, बहुउद्देशीय आदिवासी विकास संस्था, बोटेकसा येथील अध्यक्ष, वनश्री महाविद्यालयाचे संचालक, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष अशी अनेक पदे भूषविली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना २०१६ मध्ये तालुका गौरव पुरस्कार, तसेच सहकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दाेन मुली, सून व नातवंडे असा आप्तपरिवार आहे.

बुधवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. नितीन कोडवते, पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम, वामनराव फाये, नागेश्वर फाये, परमेश्वर लोहंबरे, मनोज अग्रवाल, नसरुद्दीन भामानी, सदरुद्दीन भामानी, आनंद चौबे, देवराव गजभिये व नागरिक उपस्थित हाेते.

Web Title: Congress leader Shyamlal Madavi passes away