भाजपच्या १६ कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश
By Admin | Updated: January 12, 2016 01:22 IST2016-01-12T01:22:36+5:302016-01-12T01:22:36+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने कोटगल येथे सोमवारी आयोजित महाआरोग्य शिबिरात...

भाजपच्या १६ कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश
कोटगल येथे महाआरोग्य शिबिर : २० जणांचे रक्तदान व हजारो नागरिकांची तपासणी
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने कोटगल येथे सोमवारी आयोजित महाआरोग्य शिबिरात २० जणांच्या रक्तदानासह जवळपास हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात भारतीय जनता पक्षाच्या एकूण १६ कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसमध्ये ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी खा. मारोतराव कोवासे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी होते. यावेळी रवींद्र दरेकर, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, केसरी उसेंडी, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, पी. टी. मसराम, सतीश विधाते, नरेंंद्र भरडकर, नंदू वाईलकर, सी. बी. आवळे, केदारनाथ कुंभारे, मिलींद बागेसर, मनोज पवार, महेंद्र ब्राम्हणवाडे उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी, जवळपास ३०० नागरिकांची नेत्र चिकित्सा, बालरोग तपासणी, दंत चिकित्सा, रक्तगट तपासणी करण्यात आली. दरम्यान रूग्णवाहिकेचे लोकार्पणही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र ब्राम्हणवाडे, संचालन प्रवीण मुक्तावरम तर आभार नितेश राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, कुणाल पेंदोरकर, दीपक ठाकरे, जीवन कुत्तरमारे, गौरव अलाम, राकेश गणवीर, तौफिक शेख, बाळू मडावी, प्रफुल आचले, केवळराम नंदेश्वर, अजय कुमरे, सिद्धांथ बांबोळे, साहिल शेख, रोहित सादुलवार, प्रशांत इंगोले व रूग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)