शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसतर्फे देसाईगंज येथे मोर्चा
By Admin | Updated: March 3, 2016 01:25 IST2016-03-03T01:25:03+5:302016-03-03T01:25:03+5:30
कुरखेडा, कोरची, देसाईगंज व आरमोरी या तालुक्यातील धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे हे सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसतर्फे देसाईगंज येथे मोर्चा
एसडीओंना निवेदन सादर : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
देसाईगंज : कुरखेडा, कोरची, देसाईगंज व आरमोरी या तालुक्यातील धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे हे सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे. धान उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, धानाला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव द्यावा, कर्ज माफ करावे, नगर पंचायत क्षेत्रात रोहयोची कामे सुरू करावी, धान खरेदी केंद्राच्या जागेत गोदामाचे बांधकाम करावे, धानाचे भाव वाढविण्यात यावे आदी मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देसाईगंज येथे स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
मोर्चाचे नेतृत्त्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, पंचायत समितीचे उपसभापती नितीन राऊत, पं. स. सदस्य परसराम टिकले, शिवाजी राऊत, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, आरिफ खानानी, शेहजाद शेख, राजेंद्र बुल्ले, विलास ढोरे, किशोर वनमाळी, निलोफर शेख, चंदू वडपल्लीवार, सुधीर भातकुलकर, मनिषा दोनाडकर, आनंदराव आकरे, बग्गुजी ताडाम, मंगला कोवे, श्रीनिवास आंबटवार, मिलींद खोब्रागडे, यादव गायकवाड, मुखरू देशमुख, इंदिरा मोहुर्ले, मोहन भुते, सुरेश मेश्राम, तुळशीराम काशीकर, रामभाऊ हस्तक यांनी केले.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात मोर्चा गेल्यानंतर उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे व तहसीलदार अजय चरडे यांनी निवेदन स्वीकारले. सदर निवेदन शासनाकडे पाठवून मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)