गडचिरोलीत काँग्रेसचे निदर्शने

By Admin | Updated: October 7, 2015 02:24 IST2015-10-07T02:24:43+5:302015-10-07T02:24:43+5:30

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची भाववाढ केली. या भाववाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दुपारी येथील इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

Congress demonstrations in Gadchiroli | गडचिरोलीत काँग्रेसचे निदर्शने

गडचिरोलीत काँग्रेसचे निदर्शने

पेट्रोल, डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ : सरकारविरोधात जोरदार नारेबाजी
गडचिरोली : केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची भाववाढ केली. या भाववाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने मंगळवारी दुपारी येथील इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे नेते पंकज गुड्डेवार, लोकसभा क्षेत्राध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, लता पेदापल्ली यांनी केले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप, सेना युती केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र शब्दात नारेबाजी केली. महागाई वाढविणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील असणाऱ्या भाजप प्रणित सत्ताधाऱ्यांना आगामी काळात घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन माजी आमदार डॉ. उसेंडी यांनी यावेळी केले. याप्रसंगी पांडुरंग घोटेकर, राकेश रत्नावार, अमिता मडावी, पं.स. सदस्य परसराम पदा, डी. डी. सोनटक्के, पी. टी. मसराम, जीवन कुत्तरमारे, पंडीत पुळके, सौरभ अलाम, बालू मडावी, मिलिंद किरंगे, अविनाश चलाख, सागर मानापुरे, ईश्वर चापुलवार, नितीन चापुलवार, समिर कुरेशी, रामचंद्र गोटा, दीपक ठाकरे, रविंद्र भरडकर, अमर नवघडे, प्रतिक बारसिंगे, प्रमोद म्हशाखेत्री, नितेश राठोड, गौरव अलाम, राकेश गणवीर, राकेश गडपल्लीवार, वृषभ धुर्वे, प्रफुल आचले, नचिकेत जंबेवार, चैतन्य मामीडवार, वृषभ खैरे, राहूल अलाम, ऐश्वर्य म्हस्के, अक्षय तपासे, अजय कुमरे, तुषार कुळमेथे, आदित्य नमुलवार, सौरभ नाकाडे, विशाल देशमुख, अमोल भडांगे, इरफान पठाण, भूषण भैसारे, अकबर शेख आदीसह काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Congress demonstrations in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.