केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने
By Admin | Updated: August 27, 2015 01:35 IST2015-08-27T01:35:56+5:302015-08-27T01:35:56+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँगे्रस कमिटीच्या वतीने ...

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने
घोषणाबाजी : शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँगे्रस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात बुधवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आले.
यावेळी ‘नही चलेगी नही चलेगी, दादागीरी नही चलेगी’, ‘उद्योपती तुपाशी अन् शेतकरी उपाशी’ आदी घोषणांचे फलक काँग्रेस कार्यकर्त्यांनी झळकाविले. या आंदोलनाचे नेतृत्त्व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे महासचिव पंकज गुड्डेवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, जि. प. सदस्य केशरी पाटील उसेंडी, मनोहर पाटील पोरेटी, लंकेश भोयर, देवेंद्र भांडेकर, शंकरराव सालोटकर, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, दत्तात्रेय बर्लावार, देवाजी सोनटक्के, सुनील वडेट्टीवार, पी. टी. मसराम, सुखमाबाई जांगधुर्वे, लता ढोक, अमिता मडावी, शांता परसे, पौर्णिमा भडके, रामचंद्र गोटा, दिवाकर मिसार, बाशिद शेख, समय्या पसुला, जावेद शेख, अविनाश मेश्राम, नाजूक भैसारे, महादेव पाटील भोयर, दर्शना लोणारे, लक्ष्मण कोवे, ज्योती गव्हाणे, महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, लता पेदापल्ली, अमोल भडांगे, सतीश विधाते, नितेश राठोड, नरेंद्र भरडकर, अमन नवथडे, राकेश गणवीर, तौकीक शेख, ऋषभ खैरे, अर्चना जनगंधलवार, पद्मा पसुला, लता मुरकुटे, प्रतीक बारसिंगे, गौरव अलाम, कैलास क्रिष्णापूरकर, हेमंत मोहीतकर, शेखर कोत्तावार, पुष्पा कुमरे, नंदा मडावी, नीला निंदेकार, ज्योती गव्हाणे, निशा बोदेले आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)