काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:34 IST2017-11-01T00:34:08+5:302017-11-01T00:34:25+5:30
आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी माजी आमदार आनंदराव गेडाम...

काँग्रेसच्या बैलबंडी मोर्चाची तहसीलवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुख्य नेतृत्वात आरमोरी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला. शेकडो शेतकºयांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकºयांना एकरी २५ हजार रूपये तत्काळ मदत द्यावी. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कर्जमाफीसाठी लावलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, धानाला प्रती क्विंटल ४ हजार ५०० रूपये भाव द्यावा, पेट्रोल डिझेल व गॅसची दरवाढ कमी करावी, शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, गरीब शेतकरी, शेतमजूर यांना स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ, साखर, रॉकेल व डाळीचा पुरवठा करावा आदी मागण्यांसाठी आरमोरी येथील स्थानिक राममंदिरातून मोर्चाला सुरूवात झाली. शेकडो बैलबंड्या शेतकºयांसह तहसील कार्यालयावर धडकल्या.
मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, आरमोरी विधानसभा प्रभारी डॉ. योगेंद्र भगत, पं.स. सभापती बबीता उसेंडी, जि.प. सदस्य वनिता सहाकाटे, मनिषा दोनाडकर, किशोर वनमाळी, विश्वास भोवते, बग्गुजी ताडाम, परसराम टिकले, जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, प्रा. शशिकांत गेडाम, राजीव गारोदे, कुरखेडा पं.स. सभापती गिरीधर तितराम, दौलत धुर्वे, जयंत हरडे, डॉ. मेघराज कपूर, नगरसेवक आरीफ खानानी, सुभाष सपाटे, केशव गेडाम, आनंदराव आकरे, वृंदा गजभिये, प्रभाकर टेंभुर्णे, मंगला कोवे, दीपक बेहरे, तुळशीदास काशीकर, मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, चंदू वडपल्लीवार, समशेर खॉ. पठाण, विश्वेश्वर दर्रो यांनी केले.